महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – तालुक्यातील वरवंडी पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र रामेश्वर मठ येथे ब्रह्मलीन माणिकगिरी,बिरोबा महाराज फिरत्या नारळी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती येथील गुरुवर्य महंत दत्तगिरी महाराज यांनी दिली.
येथील रामेश्वर मंदिराच्या सभामंडपात सप्ताह संदर्भात नुकतीच बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी बैठकीस गावातील अनेक गावकरी भाविक, पुढारी आदी सर्व जण उपस्थित होते.
दत्तगिरी महाराज म्हणाले, वरवंडी पंचक्रोशीतील ह्या सर्वात मोठ्या ब्रह्मलीन माणिकगिरी, बिरोबा महाराज ह्या फिरत्या नारळी म्हणजे महासप्ताचे आयोजन रविवारी (दि.१७ डिसेबर २०२३) केले असून या अखंड हरिनाम सप्ताहसाठी सर्व गावकरी तालुक्यातील भाविक भक्तांनी तन्मयतेने सामील व्हावे.
यावेळी वरवंडी गावातील सर्व लोकांनी या सप्ताहाची जोरदार तयारी सुरू केली असून सर्व भाविक भक्तांनी फिरत्या नारळी सप्ताह काळात गुण्यागोविंदाने एकत्र यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.


