Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026

रविवार विशेष लेख — हट्टी मोदींचे गर्वहरण!

July 26, 2026

आज, रविवार २६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 26, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर फेस्टिव्हल; धमाल विनोदी नाट्यप्रयोगाने फुलले हास्याचे कारंजे! चौथा दिवस अभिनेता भरत जाधवच्या भूमिकांनी गाजला
सामाजिक

संगमनेर फेस्टिव्हल; धमाल विनोदी नाट्यप्रयोगाने फुलले हास्याचे कारंजे! चौथा दिवस अभिनेता भरत जाधवच्या भूमिकांनी गाजला

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 24, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर – वैवाहिक जीवन एकमेकांच्या विश्‍वासावर अवलंबून असते. त्यात संशय निर्माण झाला की प्रेमाच्या आणाभाका घेणारी जोडपीही परस्परांकडे संशयाने पाहू लागतात आणि त्यातून संसारातील गोडवा नाहीसा होतो. अशाच कथानकाचा समावेश असलेल्या आणि सरतेशेवटी नातेसंबंधातील विश्‍वास जपण्याचा संदेश देणार्‍या केदार शिंदे लिखित, भरत जाधव यांच्या तब्बल चौदा वेगवेगळ्या भूमिकांचा समावेश असलेल्या ‘तू तू मी मी’ या धमाल विनोदी नाट्यप्रयोगाने संगमनेर फेस्टिव्हलच्या चौथ्या दिवशी प्रेक्षागारात हास्याचे कारंजे फुलवले. कमलाकर सातपुतेसह अन्य तिघांनी वठवलेल्या भूमिकेने उपस्थित प्रेक्षकांना मनात डोकवायलाही भाग पाडले.

राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूह आयोजित संगमनेर फेस्टिव्हलमध्ये शनिवारी अभिनेता भरत जाधव, कमलाकर सातपुते, निखिल चव्हाण, रुचिरा जाधव आणि ऐश्‍वर्या शिंदे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या, मराठी रंगभूमीवर गेली 25 वर्ष धुमाकूळ घालणार्‍या ‘तू तू मी मी’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.

दोन विवाहित जोडप्यांच्या वैवाहिक जीवनाचे चित्रण असलेल्या या धमाल नाटकात दोन्ही जोडप्यांना वाटते की आपला जोडीदार अयोग्य आहे. त्यातूनच त्यांच्यातील दुरावा वाढीस लागल्याचे त्यांचे मत असते. परिणामी दोन्ही जोडपी परस्परांपासून वेगळे होण्यासाठी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. धमाल म्हणजे दोन्ही जोडपी त्यांचे प्रकरण हाताळण्यासाठी एकाच वकिलाची निवड करतात. वकिलाच्या भूमिकेत रंगमंचावर अवतरणारा भरत जाधव चौघांच्याही तक्रारी ऐकून घेतो आणि त्यांना एकमेकांचे जोडीदार बदलून पंधरा दिवस एकत्र राहण्याचा सल्ला देतो.

या 15 दिवसांच्या कालावधीत घडलेली धमाल आणि आपल्या जोडीदारापासून दूर राहून झालेला विश्‍वासाचा साक्षात्कार उपस्थितींना अंतर्मुख करतो. विनोदी अभिनेता कमलाकर सातपुते आणि रुचिरा जाधव व निखिल चव्हाण आणि ऐश्‍वर्या शिंदे यांनी जोडप्यांच्या भूमिकेत काम केले आहे. अभिनेता भरत जाधव यांनी अगदी वकिलापासून ते घरगडी गंगापर्यंत साकारलेल्या वेगवेगळ्या चौदा भूमिका, क्षणात बदलणारा त्याचा पेहराव आणि रंगमंचावरील बदलती पार्श्‍वभूमी प्रेक्षकांना थक्क करणारी होती.

शेवटी, एक चांगला शेवट आणि त्यातून अर्थपूर्ण संदेश देण्याचाही प्रयत्न या नाट्यप्रयोगातून करण्यात आला आहे. नातेसंबंधामधील परस्पर विश्‍वासावर जोर देणारे हे नाटक प्रेक्षकांना उत्तम आणि यशस्वी वैवाहिक जीवन जगण्यासाठी एकमेकांवरील विश्‍वासाचे महत्त्व पटवून देते. भर पावसांत दोन तास चाललेल्या या धमाल विनोदी नाटकाने संगमनेरकरांना खळखळून हसवतांना त्यांच्यात विश्‍वास भरण्याचेही काम केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 701
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026

दंडकारण्य अभियानांतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा; वृक्ष संगोपन हीच खरी ईश्वर सेवा: माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे आवाहन

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

By अनंत पांगारकरJuly 26, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेल्या प्रत्येक लढाईमध्ये भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य…

रविवार विशेष लेख — हट्टी मोदींचे गर्वहरण!

July 26, 2026

आज, रविवार २६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 26, 2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.