Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जेष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक घटक; ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना व कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करणार – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
सामाजिक

जेष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक घटक; ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना व कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करणार – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

ज्येष्ठ नागरिकांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांनी साजरा केला वाढदिवस
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक घटक आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवून त्यांचे जीवन अधिक सुखकर बनविण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना व कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.

वसंत टेकडी येथे असलेल्या भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकीसन देवढे, ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष श्री क्षीरसागर, उद्योजक पंकज ठाकूर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे एकत्र कुटुंब पध्दती लयास चालली आहे. आई-वडिल आयुष्यभर काबाडकष्ट करून आपल्या पाल्यांना शिक्षण, प्रेम, माया देतात. समाजामध्ये आपल्या पायावर उभे राहून मानाने जगण्याइतपत बळ त्यांच्यात निर्माण करतात. परंतु याच आई-वडिलांना त्यांच्या उतारवयात वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते. स्वेच्छेने वृद्धाश्रमात येणाऱ्या ज्येष्ठांची संख्या अत्यंत कमी आहे.

शिक्षण घेऊन आपला, आपल्या बुद्धीचा विकास होणे अपेक्षित आहे. परंतु उच्च शिक्षण घेऊन परदेशात स्थाईक झालेल्या व आपल्या आई-वडिलांच्या शेवटच्या क्षणीसुद्धा वेळ नसणाऱ्या पाल्यांच्या अनेक घटना आज माध्यमे, समाज माध्यमातून आपण पाहत असतो. आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या या पाल्यांच्या जीवनाला कुठलाच अर्थ नसल्याचे सांगत आपल्या आई- वडिलांचा सांभाळ करणे हे प्रत्येक मुला-मुलीचे कर्तव्य आहे. प्रत्येक मुला-मुलींनी आपल्या आई-वडिलांचा सांभाळ केल्यास, त्यांची काळजी घेतल्यास या समाजामध्ये वृद्धाश्रमाची गरजच भासणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. तसेच कायद्याचीही निर्मितीही केली आहे. ज्येष्ठांना सन्मानाने जगता यावे यासाठी जिल्ह्यात योजनांची व कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. यासाठी महसूल, पोलीस प्रशासन, ज्येष्ठांसाठी काम करणाऱ्या विविध संघटना, कायदेतज्ञ यांची येत्या दिवसात कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अहमदनगर शहरात विरंगुळा केंद्र उभारण्याबरोबरच जिल्ह्यातील प्रत्येक गावात ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्यासाठी संघटनांना प्रशासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. तसेच आरोग्य विभागामार्फत वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची दरमहा आरोग्य तपासणीही करण्यात येईल, असेही सालीमठ यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक आयुक्त देवढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनामार्फत अनेकविध योजना राबविण्यात येतात. ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्याबरोबरच त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी विभागामार्फत समन्वय साधण्यात येतो. वृद्धांची हेळसांड थांबून त्यांना समाधानाने जगता यावे यासाठी शासनामार्फत वृद्धाश्रम सुरू करण्यास परवानगी देण्याबरोबरच अनुदानही देण्यात येत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांनी साजरा केला वाढदिवस

1 ऑक्टोबर हा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा वाढदिवस. वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसोबत केक कापून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिक व उपस्थितांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. आजच्या वाढदिवशी समाजाचे मार्गदर्शक असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आशिर्वाद लाभले, ही माझ्यासाठी खूप भाग्याची बाब असल्याचे सांगत सर्व ज्येष्ठ नागरिकांचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी ऋण व्यक्त केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 633
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.