Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्था स्कॅम : चेअरमन भाऊसाहेब कुटेसह घोटाळेबाजांच्या अटकेसाठी तिसऱ्या दिवशीही ठेवीदार-खातेदारांचे जनआक्रोश आंदोलन व उपोषण सुरूच! दोन दिवसांत काय घडले…
आंदोलन

दूधगंगा पतसंस्था स्कॅम : चेअरमन भाऊसाहेब कुटेसह घोटाळेबाजांच्या अटकेसाठी तिसऱ्या दिवशीही ठेवीदार-खातेदारांचे जनआक्रोश आंदोलन व उपोषण सुरूच! दोन दिवसांत काय घडले…

मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह व इतर आरोपींच्या त्वरित अटकेच्या मागणीवर ठेवीदार ठाम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेचे डिवायएसपी कमलाकर जाधव, पी.आय. बाळासाहेब राठोड, पी.आय. शेख, शहर पी.आय. भगवान मथुरे, पी.एस.आय. बाळासाहेब यादव, प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अमोल वाघमारे, सदस्य नवनाथ बोडके यांनी उपोषणकर्त्यांची घेतली भेट

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर

नगर जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या दूधगंगा सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि इतर आरोपींना अटक करावी या प्रमुख मागणीसह ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदार संघर्ष समितीच्यावतीने संगमनेरचे प्रांत अधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले जनआक्रोश आंदोलन आणि उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.

दरम्यान या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांचे समवेत भाजप शहर अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले, शिवसेना (शिंदे गट) तालुका अध्यक्ष रमेश काळे, शहराध्यक्ष सोमनाथ कानकाटे उपस्थित होते.

गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन देऊन याप्रकरणी लक्ष घालणार असल्याचे सांगत खासदार लोखंडे यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी, तालुका उपनिबंधक यांना लवकरात लवकर २१ आरोपी, कर्जदार व जामीनदार यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करून ठेवी परत करण्यासाठी विशेष प्रयत्न करा, अशा सूचना दिल्या. छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी आंदोलकांची भेट घेऊन छावा ब्रिगेड संघटनेच्या वतीने पाठींबा जाहीर केला.

दूधगंगेच्या या महाघोटाळ्यात २१ संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी फक्त सहाच आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यातील काही आरोपी जमिनीवर देखील सुटले आहेत. परंतु या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार असलेला पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे, त्याचे कुटुंबीय यांच्यासह उच्चभ्रू प्रतिष्ठित आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत.

पोलिसांच्या तपासाबाबत तीव्र नाराजी…

दोन महिने होत आले तरी आरोपी पोलिसांना सापडलेले नाहीत. अनेक वेळा तक्रारी व आंदोलनाचा इशारा देऊनही या आरोपींना पोलिसांनी अटक केलेली नाही. आर्थिक गुन्हे शाखा नगर यांच्याकडे हा तपास असून त्यांच्याकडून तपासात अद्यापर्यंत कोणतीही प्रगती झाल्याचे चित्र दिसत नाही. त्यामुळे या तपासाबाबत नेहमीच साशंकता व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या तपासाबाबत आणि वरिष्ठांच्या दुर्लक्ष बाबत ठेवीदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

तर आत्मक्लेष व आत्मदहन आंदोलन…

जोपर्यंत आरोपी भाऊसाहेब कुटे व त्यांचे कुटूंबीय, चेतन नागराजबाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज, कृष्णराव कदम व त्यांचे कुटूंबिय, संदिप दगडू जरे यांच्यासह उर्वरित आरोपींना अटक होत नाही, कर्जदार व जामीनदार यांच्या मालमत्ता जप्त होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन बेमुदत चालूच राहिल. ठेवीदारांना योग्य न्याय न मिळाल्यास आत्मक्लेष आंदोलन व आत्मदहन करण्यात येईल असा इशारा दुधगंगा ठेवीदार संघर्ष समितीने दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,257
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar28/09/20260

आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि फलदायी ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकतेला योग्य…

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.