Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » फेसबुक इंस्टाग्रामसारख्या सामाजिक माध्यमांच्या आभासी जगात… यशस्वीतेसाठी कष्ट व बुद्धिमत्तेला पर्याय नाही : डॉ. एकता वाबळे
शिक्षण

फेसबुक इंस्टाग्रामसारख्या सामाजिक माध्यमांच्या आभासी जगात… यशस्वीतेसाठी कष्ट व बुद्धिमत्तेला पर्याय नाही : डॉ. एकता वाबळे

'नव्या युगाच्या नव्या दिशा' या विषयावर व्याख्यान
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

सिन्नर – फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब आणि व्हाट्सअपसारख्या सामाजिक माध्यमांच्या आभासी जगात वाहवत जाऊ नका. यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट आणि बुद्धिमत्तेला पर्याय नाही. म्हणूनच आपल्या जीवनातील ध्येय निश्चित करून मार्गक्रमण करा, असा सल्ला प्रेरणादायी वक्त्या व समुपदेशक डॉ. एकता वाबळे यांनी दिला.

येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या भिकूसा हायस्कूल येथे ‘नव्या युगाच्या नव्या दिशा’ या व्याख्यानावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे होते.

वाबळे म्हणाल्या, आपल्या मनाला दररोज सकारात्मक सूचना द्या आणि जीवनात चांगले बदल घडवून आणणाऱ्या माणसांविषयी आणि परमेश्वराबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आभासी सामाजिक माध्यमांच्याद्वारे चांगलेही घेता येते तेवढेच घ्या. स्क्रीन टाईम कमी करा. आपण जे पेरतो तेच उगवते हे लक्षात ठेवा.

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी जीवनातच बचत व गुंतवणुकीचे धडे घ्या. श्रीमंत होण्याचे नक्कीच ध्येय ठेवा पण श्रीमंत होताना माणसातले माणूसपण हरवून देऊ नका. आपला देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे या मातीत आपण जन्माला आलो याचा अभिमान बाळगा. राष्ट्रभक्ती आपल्या नसानसात भिजू द्या. आई-वडील आणि गुरु हे आपले जीवनातील आदर्श असावेत, केवळ पैसाच महत्त्वाचा नाही मित्र व नातेसंबंध जपा तीच खरी संपत्ती आहे. जीवनात वाचन संस्कृतीला महत्त्व आहे. आता किंडलसारखी वाचन ॲपसुद्धा उपलब्ध आहेत त्याचाही वापर करा.

जीवनात जे-जे लोक यशस्वी झाले त्यांनी वाचन संस्कृतीचा फायदा घेतला, हे लक्षात घ्या. नकारात्मक विचार केला तर त्याचा शरीरावरील नकारात्मक परिणाम होतो हे लक्षात घ्या . स्वच्छता व संतुलित आहाराला महत्त्व द्या. राग द्वेष विसरून माफ करायला शिका प्रेमाने जग जिंकता येते असा प्रेरणादायी सल्ला त्यांनी दिला.

अध्यक्षीय भाषणात सोमनाथ जगदाळे म्हणाले, शालेय जीवनात जे चांगले संस्कार होतात तेच खऱ्या अर्थाने जीवनाचा पाया होय.

प्रास्ताविक व परिचय सुनील कडलग यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता जाधव यांनी तर आभार गायत्री सोनवणे यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 393
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.