Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नागरिकांच्या जीवाशी खेळ… दुग्ध विकास मंत्री विखे पाटलांची कबुली; राज्यातील 30 टक्के दुधात भेसळ!
सामाजिक

नागरिकांच्या जीवाशी खेळ… दुग्ध विकास मंत्री विखे पाटलांची कबुली; राज्यातील 30 टक्के दुधात भेसळ!

दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई : राज्यात वितरित होणाऱ्या दुधापैकी 30 टक्के दुधात भेसळ असल्याची स्पष्ट कबुली दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी (21 नोव्हेंबर) दूध उत्पादकांच्या बैठकीत दिली आहे.

या संदर्भातील वृत्त दैनिक महानगरने दिले आहे. दूध भेसळ शोधण्याची जबाबदारी सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे आहे. पण आता दुधातील भेसळ रोखण्याचे काम दुग्धविकास विभागावरच सोपवण्याच्या हालचाली सुरु आहेत.

मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दूध दर आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नाबाबत मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात राज्यस्तरीय बैठक पार पडली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त अजित पवार, अन्न औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे आदींचा दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत विखे पाटील यांनीच दूध भेसळीच्या संदर्भातील धक्कादायक माहिती दिली. राज्यात तीस टक्के दूधात भेसळ होत असल्याचे दुग्धविकास मंत्र्यांनीच या बैठकीत सांगितल्याची माहिती बैठकीत सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने दिली.

अपुऱ्या मनुष्यबळामुळे भेसळ रोखण्यात अपयश

राज्यात दररोज 1 कोटी 30 लाख लिटर दुधाचे संकलन होते. दुधातील भेसळ रोखण्याची जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे आहे. मात्र, अन्न आणि औषध विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. एका जिल्ह्यात दोन-तीनच अधिकारी असल्याने दूध भेसळ रोखण्यात अपयश येते. त्याशिवाय अनेकांचे अनेक ठिकाणी लागेबांधे आहेत. त्यामुळे दूधात भेसळ सुरू असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.

भेसळ रोखण्याची जबाबदारी दुग्ध विकास विभागाकडे?

दुधातील भेसळीमुळे वर्षानुवर्षे शेतकरी आणि ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. नागरिकांना वर्षानुवर्षे विषारी दूध पाजले जात आहे. हायड्रोजन पेराँक्साईड, युरीया अशा विविध रसायनांचा वापर दुधामध्ये होतो. अनेक ठिकाणी बनावट दुधाची निर्मिती होते. मिल्को मीटरमध्येही अनागोंदी आहे. दुधातील भेसळ रोखण्याची जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासनाकडून काढून घेऊन ते आता दुग्ध विकास विभागाकडे देण्याची योजना असल्याचे दुग्ध विकास मंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. मिल्को मीटरची तपासणी करण्याचे काम वजन मापन वैधता विभागाकडे आहे. हे कामही या विभागाकडून काढून घेण्यात येणार आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

विखे पाटील म्हणाले…

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दुधातील भेसळ रोखण्यात यश आले तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्त भाव देणे शक्य होईल. त्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समित्या तयार केल्या जातील. मिल्को मिटर व वजन मापाच्या त्रुटी दूर केल्या जातील. दुधाचे गुण प्रत ठरवितांना ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ वरून ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफ करण्यासंदर्भात योग्य ती पावले उचलण्यात येतील. दूध भूकटी निर्याती संदर्भात केंद्र सरकार सोबत चर्चा करू.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,507
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महायुती व महाविकास आघाडीने शिवसेनेला विश्वासात न घेता निवडणूक बिनविरोध करण्याचे…

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.