Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात महापुरुषांची स्मारके उभारणार! आमदार सत्यजित तांबे यांची ग्वाही
सामाजिक

संगमनेरात महापुरुषांची स्मारके उभारणार! आमदार सत्यजित तांबे यांची ग्वाही

आमदार बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह उभारणार 'ही' सुशोभित स्मारके
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 7, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. ७ डिसेंबर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याबरोबरच संविधानकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संगमनेरच्या लौकिकाला साजेसे स्मारक उभारणार असल्याचे सांगत आणखीही महापुरुषांची स्मारके उभारणार असल्याची ग्वाही नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन प्रसंगी तांबे बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, श्रीमती कुसुम माघाडे, के. एस. गायकवाड, विनय घोसाळे, विलास दारोळे, विनोद गायकवाड, भास्कर बागुल आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार तांबे म्हणाले, जगातील सर्वात मोठी लोकशाही व राज्यघटना देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा व मानवतेचा विचार सर्वांनी पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बसस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासह सुशोभीकरण, संविधान प्रतिमा व स्वातंत्र्य सैनिक स्मारक होणार आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य दिले. तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना दिली. हा समतेचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. राष्ट्रबांधणीच्या विचारावर आजच्या दिवशी देवाण-घेवाण होणे महत्त्वाचे आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सुशोभीकरण केले जाणार असून भव्य स्मारक उभारले जाणार आहे. तसेच याच परिसरात संविधानाची प्रतिमा तयार करून त्याच्या जवळच शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे अद्यावत व आकर्षक स्मारक निर्माण केले जाणार आहे.

बस स्थानकाच्या परिसरात दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा करण्याचे नियोजित आहे. तर याच परिसरामध्ये संगमनेर तालुक्यातील स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेले तसेच शहीद झालेले स्वातंत्र्य सैनिक यांच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव स्मारक उभारले जाणार आहे. याचबरोबर या स्मारक परिसरात शंभर फुटी तिरंगा झेंडा उभारण्याचा मानस असल्याचेही तांबे यांनी सांगितले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 462
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026

दंडकारण्य अभियानांतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा; वृक्ष संगोपन हीच खरी ईश्वर सेवा: माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे आवाहन

July 14, 2026

असंघटित कामगार: श्रेय लाटणाऱ्यांवर संजय कोल्हे यांची घणाघाती टीका; सत्तेचा दुरुपयोग करून फोटो चिटकवण्याचे राजकारण दुर्दैवी

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

By अनंत पांगारकरJuly 25, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, आळेफाटा: हातात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि पोती धरून कचरा गोळा करण्याचा…

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.