Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उपनगरातील लोकवस्तीत तो अचानक आला… त्याच्या आगमनाने सर्वांची भीतीने गाळण उडाली… पाच तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश
महाराष्ट्र संवाद विशेष

उपनगरातील लोकवस्तीत तो अचानक आला… त्याच्या आगमनाने सर्वांची भीतीने गाळण उडाली… पाच तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/12/2023Updated:22/12/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – एरव्ही त्याच्या दहशती आणि जीवघेण्या कृत्याबद्दल सर्वच ऐकून होते. शुक्रवारच्या सकाळीच त्याने नासिक-पुणे महामार्ग ओलांडत मालपाणी लॉन्समध्ये प्रवेश केला. थोडा वेळ तेथे रेंगाळल्यानंतर त्याने भिंतीवरून उडी घेत थेट मागच्या बाजूला असलेल्या पद्मनगर तेथून जवळच्याच आदर्श कॉलनीमध्ये प्रवेश केला. थांबण्यासाठी तेथे त्याला पत्र्याचे शेड दिसली आणि त्याने तेथेच काही काळ मुक्काम ठोकला. परिसरासह आसपास असलेल्या नागरिकांचे भीतीने गाळण उडाली आणि बघता बघता ही वार्ता शहरात पसरली.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2023/12/VID-20231222-WA0069.mp4

शुक्रवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास नाशिक पुणे हायवेलगत असलेल्या मालपाणी लॉन्स मध्ये एका बिबट्याने प्रवेश केला होता. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहिल्यानंतर त्याने लगेचच तेथील कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. त्यामुळे काही काळ येथे मुक्काम ठोकलेल्या बिबट्याला येथे निर्माण झालेल्या गोंधळामुळे तेथून बाहेर पडावे लागले. याचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले.

बिबट्याने तेथून धूम ठोकत मागच्या बाजूला असलेल्या पद्मनगर जवळून पुढे शेतीचा परिसर असलेल्या मालदाड रस्त्याकडे कूच केली. तेथून जवळच असलेल्या आदर्श कॉलनीमध्ये एका घरालगत पत्र्याचे शेड दिसल्याने या शेडमध्ये त्याने आपला मुक्काम ठोकला. बिबट्या आल्याची वार्ता शहरभर पसरल्याने या परिसरात नागरिकांनी बिबट्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2023/12/VID-20231222-WA0044.mp4

वनविभागाला आणि पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने त्यांची पथके घटनास्थळी दाखल झाली. परिसरातील गर्दीला नियंत्रित करत वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी आपले रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. बिबट्यावर तीनदा भूल प्रयोग करण्यात आला. बिबट्या बेशुद्ध झाल्याची खात्री पटतात वनविभागाने त्याला ताब्यात घेत पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,220
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.