Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये रविवारी रंगणार ऐतिहासिक सोहळा; बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण

July 23, 2026

आज, गुरुवार २३ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 23, 2026

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा; “भारत न्याय यात्रे”चा समारोप होणार मुंबईत
राजकारण

खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा; “भारत न्याय यात्रे”चा समारोप होणार मुंबईत

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 27, 2023Updated:December 27, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

नवी दिल्ली – काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. “भारत न्याय यात्रा” असं नाव या यात्रेला देण्यात आल असून १४ जानेवारीला मणिपूर पासून ही यात्रा सुरू होणार असल्याची घोषणा काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी केली.

खासदार गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी दक्षिण भारतातील कन्याकुमारीपासून उत्तर भारतातील काश्मीरपर्यंत काढलेली ही भारत जोडो यात्रा देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. या यात्रेचा दुसरा टप्पा लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू होईल अशी शक्यता होती. मात्र २२ जानेवारीला होत असलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अति भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आता ही यात्रा १४ जानेवारीला मणिपूर पासून सुरू होणार आहे. यात्रेचा शेवट २८ मार्चला महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत होईल. त्यामुळे या यात्रेला राज्यात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

भारत न्याय यात्रेच्या म्हणजेच भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्व ते पश्चिम भाग सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मणिपूर मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या प्रश्नावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. याच मणिपूरमधून आता गांधी यांच्या भारत न्याय यात्रेची सुरुवात होणार आहे.

लोकसभेच्या सर्वाधिक जागांमध्ये उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागत असल्याने मुंबईत यात्रेचा समारोप होईल. तर हीच बाब लक्षात घेत काँग्रेसच्या स्थापना दिनी गुरुवारी काँग्रेसने नागपूरमध्ये महासभेचे आयोजन केलं असून या सभेला ‘है तयार हम’ असं नाव देण्यात आला आहे या सभेच्या माध्यमातून २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

एकीकडे मोदी सरकारने रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय केला असतांनाच काँग्रेसने मात्र महाराष्ट्रातून त्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 408
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

अहिल्यानगरमध्ये रविवारी रंगणार ऐतिहासिक सोहळा; बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण

By अनंत पांगारकरJuly 23, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी): अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव फाटा परिसरातील संत तुकाराम नगर…

आज, गुरुवार २३ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 23, 2026

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.