Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

June 6, 2026

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून तालुकाप्रमुख अजितदादांच्या राष्ट्रवादीत! नगर जिल्ह्यात अजित पवारांचा उद्धव ठाकरेंना धक्का
Uncategorized

शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून तालुकाप्रमुख अजितदादांच्या राष्ट्रवादीत! नगर जिल्ह्यात अजित पवारांचा उद्धव ठाकरेंना धक्का

अकोल्यात आता दोन डॉक्टर करणार काम
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 18, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेशानंतर उत्तर नगर जिल्ह्यात झालेल्या राजकीय फेरबदलामुळे शिवसेनेत मोठी अस्वस्थता आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शिवसेनेचे माजी अकोले तालुकाप्रमुख डॉ. मनोज मोरे यांनी अजित पवारांची साथ धरली आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना काँग्रेस भाजप असा प्रवास करत पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रवेशानंतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असतानाच त्या पाठोपाठ पक्षप्रमुखांनी जिल्ह्याच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल करत रावसाहेब खेवरे यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची धुरा सोपविली. त्यापाठोपाठ वाकचौरे आणि खेवरे यांच्यावरची सुप्त नाराजी आता समोर येऊ लागली आहे.

नव्या पदाधिकारी निवडीनंतर मध्यंतरी नाराज असलेल्या निष्ठावंत माजी पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी संगमनेरमध्ये उत्तर नगर जिल्ह्यातील निष्ठावंतांचा मेळावा आयोजित केला होता. मात्र ऐनवेळी पक्षांतर्गत सूत्रे फिरली आणि मेळावा घेणाऱ्यांना आपला निर्णय पुढे ढकलावा लागला. मात्र नाराजांची समजूत काढण्यात पक्षश्रेष्ठी अयशस्वी ठरत असल्याचे आता दिसत आहे. याचीच परिणती म्हणून मोरे यांनी आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

पक्ष प्रवेशानंतर मोरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
पक्ष प्रवेशानंतर मोरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोरे यांचे पक्षात स्वागत केले यावेळी अकोल्याचे आमदार किरण लहामटे उपस्थित होते. मोरे यांच्या प्रवेशानंतर शिवसेनेच्या ठाकरे गोटात खळबळ उडाली असून उत्तर नगर जिल्ह्यातील अन्य नाराज पदाधिकारी आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

डॉ. मोरे यांना शिवसेनेचे तालुकाप्रमुख म्हणून संधी मिळाल्यानंतर त्यांनी अकोले तालुक्यामध्ये शिवसेनेची मोठी बांधणी केली होती. गावागावात शिवसेनेच्या शाखा निर्माण केल्या. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली दोन सदस्य निवडून गेले. खरेदी विक्री संघातही दोन जागांवर यश मिळाले, एवढेच नव्हे तर तेथे उपाध्यक्षपदही पदरी पाडून घेण्यात यशस्वी झाले. काम करणारा पदाधिकारी दुरावल्याने शिवसेनेची या भागात हानी झाली आहे. मोरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यात त्यांनी पक्ष सोडण्याचे कारण स्पष्ट केले नसले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सांगितले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,197
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर न्यायालयाने एका पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात…

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.