Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडे धरण, कालव्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद; आमदार थोरात यांच्यामुळेच विकासाच्या योजना गाव-वाडी-वस्तीपर्यंत: डॉ. जयश्री थोरात
सामाजिक

निळवंडे धरण, कालव्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद; आमदार थोरात यांच्यामुळेच विकासाच्या योजना गाव-वाडी-वस्तीपर्यंत: डॉ. जयश्री थोरात

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/01/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – प्रत्येक कुटुंब आणि देशाच्या विकासात स्त्रियांचे मोठे महत्त्व आहे. ५० टक्के लोकसंख्या असलेल्या स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून महिला निरोगी असली तर कुटुंब निरोगी राहते. संगमनेर तालुका हा एक परिवार समजून आमदार थोरात यांनी प्रत्येक गाव-वाडी-वस्तीपर्यंत विकासाच्या योजना राबविल्या. त्यांच्याच अथक प्रयत्नातून साकारलेल्या निळवंडे धरण आणि कालव्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी केले.

कोळवाडे येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद व एकवीरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्त्री ग्रामसंघ भवन उद्घाटन व तिळगुळ वाटपप्रसंगी कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी संशोधक कॅन्सर तज्ञ डॉ. हसमुख जैन, गटविकास अधिकारी अनिल नागणे, माजी पंचायत समिती सदस्य काशिनाथ गोंधे, भाऊसाहेब नवले, सोपान वर्पे, पुष्पाताई गुंजाळ, बाबुराव गोंधे, मुख्याध्यापक दशरथ वर्पे, निलेश कोकाटे ,रवींद्र खलाटे, योगेश गुंजाळ, मंगेश वर्पे, शैला घोडे, कल्याणी कुदळ, अभिजीत गंभीरे, महेश पारधी, वनिता काटे, भाग्यश्री बांबळे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

थोरात म्हणाल्या, संगमनेर तालुका हा राज्यातील प्रगतशील तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्याच्या विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. तालुक्यातील महिला या खूप कष्टाळू आहेत. सकाळी लवकर उठण्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत शेतीची अनेक कामे त्या सांभाळतात. मात्र हे सर्व करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. स्त्रियांचे आरोग्य चांगले असेल तर कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. कॅन्सरबाबत वाढता प्रादुर्भाव हा अत्यंत चिंताजनक असून महिलांनी कोणतीही गाठ आली तर त्वरित आपल्या जवळच्या व्यक्ती किंवा डॉक्टरांना सांगितले पाहिजे.

Advt
Advt

कॅन्सरवर पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे मात करता येते. कोणतीही गाठ असेल किंवा आरोग्याबाबत कधीही मला संपर्क करा. संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी आमदार थोरात यांनी अविरत काम केले असून सर्वात मोठ्या असलेल्या या तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडी-वस्तीवर विकासाच्या योजना पोहोचविल्या आहेत. अनेक मोठमोठी विकास कामे मार्गी लावताना समृद्ध सहकार उभारला. सहकारामुळे संगमनेर तालुका हा देश पातळीवर ओळखला जातो.

दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण, कालवे आमदार थोरात यांनी पूर्ण केले असून या कालव्यांचे पाणी आता शेतात येत आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. एक तालुका एक परिवार ही संकल्पना आपल्या तालुक्याची असून प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात आमदार थोरात सहभागी होत असतात. सर्वधर्म समभाव व सर्वांना समान संधी असल्यामुळे संगमनेर तालुका हा सुसंस्कृत वैभवशाली व विकसित तालुका म्हणून ओळखला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कल्याणी कुदळ यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दशरथ वर्पे यांनी, सूत्रसंचालन दिलीप बांबळे व अश्विनी गुंजाळ यांनी केले. मंगल कुदळ यांनी आभार मानले. यावेळी कोळवाडे व परिसरातील महिला नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गटविकास अधिकारी अनिल नागने म्हणाले, संगमनेर तालुक्यात उमेदच्या माध्यमातून अनेक बचत गटांची स्थापना झाली. यामधून महिला सक्षमीकरणाला मोठा वाव मिळाला. अनेक महिलांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले. यातून कुटुंबासाठी त्या हातभार लावत आहेत.

Advt

बचत गटांनी बनवलेल्या वस्तूंच्या बाजाराने गाव फुलले…

उमेद व जयहिंदच्या माध्यमातून कोळवाडे व परिसरात सुमारे ६० बचत गट कार्यरत असून या बचत गटांच्या महिलांनी बनवलेल्या विविध वस्तू व खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले होते. यामुळे २६ जानेवारीच्या दिवशी कोळवाडे गाव बाजारासारखे फुलून गेले. अनेक परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी येऊन मोठी खरेदी विक्री केल्याने बचत गटांच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल झाली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 809
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महायुती व महाविकास आघाडीने शिवसेनेला विश्वासात न घेता निवडणूक बिनविरोध करण्याचे…

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.