Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगरच्या आमदाराच्या ताबेमारी, झुंडशाही, गुंडगिरीविरोधात अनेकांच्या फाईल्स; ताबेमारीविरुद्ध छापामारी कशी करायची हे शिवसेनेला माहित: खासदार संजय राऊत
राजकारण

नगरच्या आमदाराच्या ताबेमारी, झुंडशाही, गुंडगिरीविरोधात अनेकांच्या फाईल्स; ताबेमारीविरुद्ध छापामारी कशी करायची हे शिवसेनेला माहित: खासदार संजय राऊत

नगरच्या आमदाराच्या घरावर व जिल्हा प्रशासनावर महाविकास आघाडीचा मोर्चा काढणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/01/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

अहमदनगर – मुंबई दाऊद, छोटा शकील, अबू सालेम, टायगर मेमन ही मंडळी खंडणी, जमीन बळकावत दहशत निर्माण करत होते, परंतु शिवसेना त्यांच्या विरोधात उभी राहिली. तुम्ही गुंड तर आम्हीही महागुंड असे म्हणत रस्त्यावर उतरून विरोध केल्याने ते पळून गेले. आता माझ्याकडे नगरच्या आमदाराच्या ताबेमारी, झुंडशाही, गुंडगिरीविरोधात अनेकांच्या फाईल्स आल्या. राज्यात नवे सरकार आल्यापासून त्यांचे गुंडाराज वाढले आहे. नगरमधील या गुंडगिरी व ताबेमारीविरुद्ध छापामारी कशी करायची हे शिवसेनेला माहित आहे. सरकारने ताबामारी थांबविली नाही तर अहमदनगरच्या रस्त्यावर तमाशा होईल. या आमदाराच्या घरावर व जिल्हा प्रशासनावर माझ्या नेतृत्वाखाली मी महाविकास आघाडीचा मोर्चा काढणार असल्याचा इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिला.

नगरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानिमित्ताने राऊत नगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, माजी आमदार विजय औटी, शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसुंदर, उपनेते साजन पाचपुते, योगीराज गाडे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. राऊत म्हणाले, नगरचे माजी आमदार अनिल भैया राठोड यांनी गुंडगिरी व झुंडशाही विरोधात टक्कर दिली. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांना पोरकेपणा जाणवत आहे. मात्र भैय्यांचा विधानसभेत पराभव का व कसा घडवला गेला हे आम्हाला माहित आहे. एकीकडे राम राम म्हणत मार्केटिंग करायचे व दुसरीकडे देवस्थान व शैक्षणिक संस्थांच्या जमिनी, भूखंड, शिवसेना नगरसेवकांची कामे लुटली जात आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. व्यापार करणे त्यांना मुश्किल झाले आहे. शहर सोडण्याची भाषा ते करीत आहेत.

Advt

नगरचे आमदार महाविकास आघाडी सोबत होते आता मात्र ते राज्यातील नव्या सरकार सोबत आहेत. नव्या सरकारच्या पाठबळामुळे ते नगरमध्ये गुंडगिरी व ताबेमारी करीत आहेत. नगरमधील गुन्हेगारीवर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे त्यांचा बॉस कोण आहे हे स्पष्ट होऊ द्या. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री त्यांचे पोशिंदे तर नाहीत ना असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित करीत नगरमधील ताबेमारी थांबली नाही तर या विरुद्ध शिवसेना रस्त्यावर उतरेल. मुंबईतील गुंडगिरी विरुद्ध जसा संघर्ष केला तसाच नगरमध्ये केला जाईल. असे देखील ते म्हणाले.

२०१४ पूर्वी महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य होते मात्र भाजपने राज्यात द्वेष व आकस वाढविला. राजकीय विरोधकाला शत्रू मानून त्याला कुटुंबासह संपवण्याचे घातक राजकारण दिल्लीतील भाजपाचे नेते करीत आहे. द्वेष, सूड, बदला असे प्रकार गेल्या दहा वर्षात वाढले असून राज्याच्या सुसंस्कृत संस्कृतीला भाजपने काळे फासले असल्याचे राऊत यांनी सांगितले.

अयोध्येत राम तर बिहारमध्ये पलटूराम..

नितेश कुमार यांचे मानसिक स्वास्थ ठीक नाही ते आमच्यापासून दूर गेल्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. त्यांनी राजीनामा दिला, राजीनामा देणे हा नितेश कुमार यांचा छंद आहे. अयोध्येत राम आहे तर बिहारमध्ये पलटूराम आहे. सगळ्यात मोठे पलटूराम भाजप आहे, असे देखील राऊत म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,204
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवड

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर नगरपरिषद क्षेत्रासाठीच्या पथ विक्रेता तक्रार निवारण व…

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.