Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये रविवारी रंगणार ऐतिहासिक सोहळा; बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण

July 23, 2026

आज, गुरुवार २३ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 23, 2026

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात १२८ लाभार्थ्यांना ९ लाख ८३ हजार रुपयांचे साहित्य मंत्री विखेंच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर – अमोल खताळ पाटील
राजकारण

समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात १२८ लाभार्थ्यांना ९ लाख ८३ हजार रुपयांचे साहित्य मंत्री विखेंच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर – अमोल खताळ पाटील

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 30, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – समाजकल्याण विभागाच्या माध्‍यमातून संगमनेर तालुक्यातील १२८ लाभार्थ्‍यांना ९ लाख ८३ हजार रुपयांचे साहित्य महसूल तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या विशेष प्रयत्नातून मंजूर झाल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली.

या साहित्यामध्ये कडबा कुट्टी, पीठ गिरणी, लेडीज सायकलींचा समावेश आहे. सरकारच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी ग्रामीण भागातील गरजवंतांना योजनेचा लाभ व्हावा, यासाठी मंत्री विखे यांच्या माध्यमातून संगमनेरमध्ये भारतीय जनता पार्टीच्यावतीने काम सुरु आहे.

पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यकाल संपलेला असल्यामुळे समाजकल्याण विभागाच्यावतीने सुरु असलेल्या योजनेचा लाभ मिळतो की नाही, अशी शंका काहींनी व्यक्त केली होती. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ग्रामीण भागात गावागावात या योजनेसाठी पात्र असलेल्यांशी संपर्क साधून प्रकरणे समाज कल्याण विभागात जमा करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

संगमनेर तालुक्यात मंत्री विखेंच्या माध्यमातून यासाठी करोडो रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी मिळत आहे. त्या माध्यमातून अनेक वर्ष प्रलंबित असलेले अनेक विषय मार्गी लागत असल्याचे समाधान नागरिक व्यक्त करत आहे.

विखे यांच्या सूचनेनुसार नुकतेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर यांनी संगमनेर तालुक्यासाठी १८ कडबा कुट्टीसाठी ४ लाख ६८ हजार रुपये, १८ पिठ गिरणीसाठी २३ हजार ४०० रुपये, शालेय मुलींसाठी ८२ लेडीज सायकलसाठी ४ लाख ९२ हजार रुपये मंजूर केले असून केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोक हितकारी योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन अमोल खताळ यांनी केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 598
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

अहिल्यानगरमध्ये रविवारी रंगणार ऐतिहासिक सोहळा; बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण

By अनंत पांगारकरJuly 23, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी): अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव फाटा परिसरातील संत तुकाराम नगर…

आज, गुरुवार २३ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 23, 2026

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.