Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘निळवंडे’च्या पाणीवाटपाचा आमदार बाळासाहेब थोरातांचा सरकारकडे प्रस्ताव, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मॉडेलचा प्रयोग करावा!’
महाराष्ट्र संवाद विशेष

‘निळवंडे’च्या पाणीवाटपाचा आमदार बाळासाहेब थोरातांचा सरकारकडे प्रस्ताव, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मॉडेलचा प्रयोग करावा!’

बातमी सौजन्य दैनिक लोकसत्ता
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महायुती सरकारने निळवंडे पाणी वाटपाचा प्रस्ताव मार्गी लावला नाही तर आगामी काळात आमचे महाविकास आघाडीचे सरकार मार्गी लावेलच!

नगर : आठमाही धरण असलेल्या निळवंडे प्रकल्पाचे पाणीवाटप कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत असला तरी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक प्रस्ताव पाठवला आहे. सरकारने त्याचा अभ्यास करावा व निर्णय घ्यावा, शेवटचा शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी. एका नव्या मॉडेलचा प्रयोग सरकारने यशस्वी करून दाखवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

सध्याच्या महायुती सरकारने निळवंडे पाणी वाटपाचा प्रस्ताव मार्गी लावला नाही तर आगामी काळात आमचे महाविकास आघाडीचे सरकार मार्गी लावेलच अशीही टिप्पणी त्यांनी केली. माजी मंत्री, आमदार थोरात शुक्रवारी नगरमध्ये होते. त्यानिमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जलसंपदा मंत्री फडणवीस यांच्याकडे निळवंडे धरणाच्या पाणीवाटपाचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती दिली.

गेली अर्धशतक रखडलेला निळवंडे प्रकल्प नुकताच पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाले. डाव्या उजव्या कालव्यातून नुकतेच पाणीही सोडले जाऊ लागले आहे. या पाश्र्वभूमीवर आता नगर जिल्हयातील ६ व नाशिक जिल्हयातील १ अशा ७ तालुक्यांमधील १८२ गावांतील ६७ हजार ८७८ हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली येणार आहे. धरणाची क्षमता ८.३२ टीएमसी आहे. डाव्या कालव्याची लांबी ८५ कीमी तर उजव्या कालव्याची लांबी ९२.५० किमी आहे.

या पार्श्वभूमीवर निळवंडे धरणाचे पाणीवाटप कसे होणार हा कळीचा मुद्दा निर्माण झाला आहे. तो आगामी काळात जिल्ह्यात विशेषतः उत्तर भागात संवेदनशीलतेचा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार थोरात यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सांगितले की, निळवंडेसाठी पूर्वी खलनायक असणारे आता जलनायक असल्याचा दावा करत असले तरी लोकांना निळवंडे कोणामुळे झाले याची माहिती आहे. निळवंडे धरण आठमाही आहे. ऑक्टोबरच्या पावसानंतर ते भरणार असले तरी त्याचा लाभ वंचित शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, यामध्ये पाणी वापर संस्था महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

नाशिकमधील दिंडोरी तालुक्यात एका धरणाबाबत आम्ही हा प्रयोग यशस्वी केला आहे. गहू किंवा इतर पिकांमुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था फार सुधारत नाही. त्यामुळे कोणते पीक घ्यावे हे ठरवले गेले पाहिजे, फळबागांना प्राधान्य द्यायला हवे. त्याचबरोबर पाण्याचाही काटकसरीने वापर व्हायला हवा. या माध्यमातून नव्या ‘मॉडेल’चा प्रयोग सध्याच्या सरकारने करावा अशीही अपेक्षा थोरात यांनी व्यक्त केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,287
आमदार बाळासाहेब थोरात निळवंडे धरण पाणी वाटप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

By Annant Ppangarkar06/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र…

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.