Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये धडक मशाल मोर्चा

July 22, 2026

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026

आज, बुधवार २२ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शरद पवारांनी ईडी कारवाईचा हिशोबच मांडला… विकासासाठी नव्हे तर तपास यंत्रणांकडून सुरू असलेली चौकशी थांबविण्यासाठी पक्ष सोडला!
राजकारण

शरद पवारांनी ईडी कारवाईचा हिशोबच मांडला… विकासासाठी नव्हे तर तपास यंत्रणांकडून सुरू असलेली चौकशी थांबविण्यासाठी पक्ष सोडला!

भाजपसह अजित पवारांवर केली टीका
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 11, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पुणे – भाजपाच्या विचारांच्या विरोधात कोणी भूमिका घेत असेल तर सत्तेचा दुरुपयोग करून कारवाई केली जात आहे. यापूर्वी लोकांना फारसा माहिती नसलेला ईडी हा शब्द आता भाजप सरकारच्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. गेल्या काही वर्षात ईडीने ६ हजार गुन्ह्यांची नोंद केली चौकशीअंती यात सत्यावर आधारित केवळ २५ खटले निघाले. त्यापैकी अवघ्या दोघांना शिक्षा झाली. या गुन्ह्यांच्या तपासासाठी ईडीने ४०४ कोटी रुपये खर्च केले. याशिवाय जे आज पक्ष सोडून विकासासाठी भाजपसोबत गेले असे सांगत आहेत, त्यात तथ्य नसून काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. ती चौकशी सत्तेत गेल्यानंतर बंद झाली. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला, असं म्हणणं चूक असल्याचं सांगत आज शरद पवारांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.

रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपावर टीका करतानाच ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईची आकडेवारी सादर केली.

भाजपा सत्तेत आल्यानंतर १२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षांचे सरकार असणाऱ्या राज्यातील १४ मंत्री,२४ खासदार, २१ आमदार, ७ माजी खासदार यांचा समावेश आहे. मात्र यात एकाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचे नाव नसल्याचे सांगत भाजपच्या नेत्यांविरोधातील चौकशी थांबविण्यात आली, याचा नेमका अर्थ काय काढायचा? असा सवालही पवारांनी उपस्थित केला.

ईडी कोणाच्या मागे लागली, याकडेही पाहिले पाहिजे. गेल्या काही वर्षात अनेक नेत्यांच्या चौकशी झाल्या यापैकी ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षातील आहेत. भाजपने ईडीचा हत्यारासारखा वापर केला.

आज आपण वेगळ्या स्थितीतून जात आहोत. केंद्रातील सत्ता एका पक्षाच्या हातात आहे. उत्तरेकडील राज्यांचीही सत्ता भाजपाच्या हातात आहे. त्यांची धोरण सामाजिक ऐक्याला धक्का पोहोचविणारी आहेत.

काल लोकसभेचे अधिवेशन संपलं. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात विधायक काहीही न सांगता केवळ नेहरू-गांधी यांच्यावरच भाष्य केलं. नेहरूंनी लोकशाही रुजविले. लोकशाहीचे शासन दिलं, त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले मोदी करत आहेत. यातून काय साध्य होणार असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 679
ईडी कारवाई पुणे शरद पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये धडक मशाल मोर्चा

By अनंत पांगारकरJuly 22, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ​संगमनेर: ​दिल्ली येथे आपल्या विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर…

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026

आज, बुधवार २२ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.