Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये धडक मशाल मोर्चा

July 22, 2026

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026

आज, बुधवार २२ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » किचनमध्ये धोकादायक ठरू शकणारे ९० बनावट गॅस रेग्युलेटर पोलिसांनी केले जप्त; विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल
गुन्हेगारी

किचनमध्ये धोकादायक ठरू शकणारे ९० बनावट गॅस रेग्युलेटर पोलिसांनी केले जप्त; विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 18, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – नामांकित कंपनीच्या नावाने बनावट गॅस रेग्युलेटरची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून संगमनेर पोलिसांनी ९० बनावट गॅस रेग्युलेटर जप्त केले आहे. संबंधित विक्रेत्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

शहरातील सय्यद बाबा चौकात असलेल्या भारत स्टील नावाच्या दुकानात स्वयंपाक घरात नेहमीच वापरल्या जाणाऱ्या गॅस टाकीसाठीच्या बनावट गॅस रेग्युलेटरची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना समजली होती.

संबंधित ठिकाणी शनिवारी रात्री बनावट ग्राहक पाठवून यासंबंधी खात्री करण्यात आली. बनावट ग्राहकाने रेग्युलेटर खरेदी केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यालयातील कर्मचारी राहुल डोके, राहुल सारबंदे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी दुकानाची झाडाझडती घेतली असता त्यांना ९० बनावट रेग्युलेटर आढळून आले.

भारत कंपनी असे नाव असलेल्या पिवळ्या रंगाचे १६, एचपी कंपनी असे नाव असलेल्या निळ्या रंगाच्या १४, सेफ गॅस नाव असलेल्या राखाडी रंगाच्या ६० रेग्युलेटरचा समावेश आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी हे सर्व गॅस रेग्युलेटर जप्त केले असून रैय्यान शेरखाण पठाण या दुकान मालका विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. तो विक्री करत असलेले बनावट गॅस रेग्युलेटर त्याने कुठून आणले, यापूर्वी शहरात किती गॅस रेग्युलेटरची विक्री केली. या संदर्भात पोलीस तपास करत आहे.

कारवाई करण्यात आलेल्या संबंधित दुकान मालकाकडे गॅस रेग्युलेटर विक्रीचा कोणताही परवाना नाही. बनावट गॅस रेग्युलेटरच्या विक्रीतून तो स्वतःसाठी आर्थिक फायदा घेत असून शेकडो नागरिकांचे आयुष्य धोक्यात आणत आहे. अशा प्रकारच्या रेग्युलेटर वापरातून स्वयंपाक घरात गॅस सिलेंडर स्फोटासारखी मोठी गंभीर दुर्घटना घडू शकते. शिवाय आजूबाजूच्या नागरिकांचे जीवन देखील धोक्यात येऊ शकते त्यामुळे नागरिकांनी याबाबत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक संगमनेर.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,002
गॅस रेग्युलेटर सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये धडक मशाल मोर्चा

By अनंत पांगारकरJuly 22, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ​संगमनेर: ​दिल्ली येथे आपल्या विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर…

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026

आज, बुधवार २२ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.