Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आता पालिकेच्या सभागृहात शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे तैलचित्र; एमपीएससी व यूपीएससी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार! नगर परिषदेच्यावतीने आयोजित शिवजयंती सोहळा उत्साहात
प्रशासन

आता पालिकेच्या सभागृहात शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे तैलचित्र; एमपीएससी व यूपीएससी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार! नगर परिषदेच्यावतीने आयोजित शिवजयंती सोहळा उत्साहात

शासकीय अधिकाऱ्यांचा मिरवणुकीत समावेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/02/2024Updated:19/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संगमनेर नगर परिषदेच्यावतीने सालाबाद प्रमाणे, शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उत्साहात साजरी करण्यात आली. नगरपालिका रांजणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत संगमनेरमधील विविध विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांसह नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालिकेतील कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते.

प्रारंभी नगरपरिषद प्रांगणात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संगमनेरचे प्रांत अधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल नागणे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ, उपमुख्याधिकारी संजय पेखळे, कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्षांचा कालावधी उरला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने राज्याभिषेक सोहळ्याचे मानचिन्ह वापरण्याचे निर्देश शासकीय कार्यालयांना दिले आहे. या निर्देशानुसार संगमनेर नगर परिषदेच्या रामकृष्ण सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या तैलचित्राचे अनावरण प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत असलेले नगरपरिषदेचे जमादार संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

संगमनेर नगर परिषदेच्या रघुनाथ शिवजीराम करवा व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर येथे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी एमपीएससी व यूपीएससी या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून शासनाच्या विविध क्षेत्रातील कार्यालयात अधिकारी पदावर कार्यरत झाल्याबद्दल अशा विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सह्याद्री विद्यालयातील शिक्षक विद्यार्थी यांनी एकत्रित महाराष्ट्र राज्य गीताचा दर्जा असलेल्या महाराष्ट्र माझा गीताचे गायन केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नगरपरिषदेचा प्रांगणातून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.

नगरपरिषदेच्या प्रांगणातून ढोल ताशांच्या गजरात निघालेली शिवरायांची मिरवणूक शहरातील बाजारपेठ, तेली खुंट, सय्यद बाबा चौक, मेनरोड, अशोक चौक या मार्गाने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापाशी आली. तेथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सांगता झाली. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ यांच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवर अधिकाऱ्यांसमवेत या मिरवणुकीत समावेश होता.

संगमनेर नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीचे विविध छायाचित्रे (काशिनाथ गोसावी)
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 604
अनिल नागणे धीरज मांजरे भगवान मथुरे राहुल वाघ शिवजयंती शैलेंद्र हिंगे संगमनेर नगर परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.