Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वाळू तस्करी आणि हेरगिरी विरोधात संगमनेरचे तहसीलदार ॲक्शन मोडवर… वाळू उपसा करणाऱ्या आठ जणांना धाडल्या कारवाईच्या नोटीसा
प्रशासन

वाळू तस्करी आणि हेरगिरी विरोधात संगमनेरचे तहसीलदार ॲक्शन मोडवर… वाळू उपसा करणाऱ्या आठ जणांना धाडल्या कारवाईच्या नोटीसा

खुलासा करण्यासाठी दिली दोन दिवसाची डेडलाईन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २८

नगर एलसीबी आणि तालुका पोलिसांनी केलेल्या वाळू तस्करीच्या कारवाईनंतर संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे ॲक्शन मोडवर आले आहे. संगमनेर खुर्द येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्या आठ जणांना तुमच्यावर कारवाई का करू नये, अशा आशयाच्या नोटिसा बजावल्या आहे. याशिवाय महसूलची हेरगिरी करणाऱ्या आणि वाळू तस्करीला मदत करणाऱ्यांना देखील कारवाईच्या नोटिसा बजावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.राज्याचे महसूल आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरसह राज्यातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह वाळू तस्करांकडून सुरू असलेल्या बेकायदा वाळू तस्करीकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी त्यांनी नवे वाळू धोरण देखील आणले असून त्याची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. असे असले तरी या धोरणाची सर्रासपणे पायमल्ली करत विविध ठिकाणी वाळू तस्करी जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे देखील समोर आले आहे.
नगर एलसीबीच्या पथकाने तालुक्यातील खांडगाव शिवारात केलेल्या अवैध वाळू वाहतुकीवरील छापेमारीत सत्ताधारी पक्षातीलच राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी आढळून आले. याशिवाय तालुक्यातील महसूलमंत्र्यांच्या मतदार संघात भगवा ध्वज लावून सुरू असलेली वाळू तस्करी पोलिसांनी समोर आणली. यातील आरोपी अद्याप निष्पन्न झालेले नाही.
या पार्श्वभूमीवर तहसीलदार धीरज मांजरे ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी संगमनेर खुर्द परिसरात वाळू उपसा करणाऱ्या आठ जणांना कामगार तलाठी यांच्या अहवालावरून आपल्यावर दंडात्मक कारवाई का करू नये असे विचारणा करत त्यांना दोन दिवसात खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. तहसीलदारांनी बजावलेल्या या नोटिसांमुळे बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
पाटीलमळा येथील प्रसाद गुंजाळ यांच्या शेतातून रात्रीच्यावेळी आणि साई अमृत पेट्रोल पंपाजवळील रस्त्याने रात्रीच्यावेळी समीर शेख, अझहर खान, संजय वाकचौरे, धनंजय गोसावी, हर्षल शेजूळ, लक्ष्मण गोसावी, अभिजीत शिंदे, प्रसाद गुंजाळ हे अनधिकृतपणे वाळू उपसा करून वाहतूक करत असल्याचा अहवाल कामगार तलाठी यांनी तहसीलदारांना सादर केला होता. त्याची दखल घेऊन तहसीलदार मांजरे यांनी आपल्यावर दंडात्मक कारवाई का करू नये? अशी विचारणा ’करत दोन दिवसांत खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. जर मुदतीत खुलासा सादर केला नाही तर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.
संशयास्पदरित्या रात्रीच्यावेळी नदीकाठी वाळू चोरी अथवा महसूल पथकावर गस्त ठेवणारे लोक आढळून येतील अशा लोकांवर देखील सीआरपीसी १०९ प्रमाणे कारवाई करण्यात येणार असून वाळू चोरी करणार्‍या, वाळूची वाहतूक करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांनादेखील नोटिसा पाठविला जाणार असल्याचे तहसीलदार मांजरे यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,287
धीरज मांजरे वाळू तस्करी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर; मालपाणी लॉन्सवर विविध लाभांचे होणार वाटप

30/07/2026

डिजिटल जनगणनेचा श्रीगणेशा; नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन नोंदवण्याचे तहसीलदार धिरज मांजरे यांचे आवाहन

05/05/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर…

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.