Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार २९ ऑक्टोंबर २०२६ — कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

29/10/2026

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

28/10/2026

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

28/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अत्याधुनिक उपचारांचे ‘एसएमबीटी मॉडेल’ ठरणार देशात आदर्श – डॉ. रघुनाथ माशेलकर
आरोग्य

अत्याधुनिक उपचारांचे ‘एसएमबीटी मॉडेल’ ठरणार देशात आदर्श – डॉ. रघुनाथ माशेलकर

एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युट शानदार भूमिपूजन सोहळा; चार सेवांचा दिमाखात शुभारंभ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/02/2024Updated:29/02/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नाशिक,
भारताला उत्तम तंत्रज्ञानाची व अत्याधुनिक उपचारांची आवश्यकता आहे. उपचार परवडणारे असलेच पाहिजेत पण त्यात एक्सलन्स अधिक महत्वाचा भाग आहे. अत्याधुनिक उपचारांचे एसएमबीटी मॉडेल देशात आदर्श बनेल, असे प्रतिपादन प्रख्यात शास्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युट टाटा मेमोरियल सेंटर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाने साकारल्या जाणाऱ्या विशेष सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भूमिपूजन सोहळा आणि एसएमबीटी केअर प्लस, एसएमबीटी बोन मॅरो ट्रान्सप्लांट, एसएमबीटी टेलीमेडीसीन, एसएमबीटी ई-कॅम्पस या विविध सेवा उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी डॉ. माशेलकर बोलत होते. याप्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात, माजी विधानपरिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ एस. डी. बनवली, डॉ पंकज चतुर्वेदी, डॉ राहुल पुरवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
माशेलकर म्हणाले, रुग्णालय उत्तम दर्जाचे असले की ते महाग असते असे म्हटले जाते. मात्र, एसएमबीटी वेगळे हॉस्पिटल आहे, कमीत कमी दरांत गुणवत्तापूर्ण उपचार द्यावयाचे सोबत एक्सलन्सदेखील टिकवून ठेवायचे. एसएमबीटीने केलेल्या इम्युनोअॅक्ट थेरपी सेवा ग्रामीण भागात मिळू लागल्यावर अनेक रुग्णांची सोय होणार आहे. एसएमबीटी हॉस्पिटल भारतासाठी नव्हे तर जगासाठी उत्तम उदाहरण होईल.
इम्यूनसेल बाहेर काढून ट्रेन केल्या जातात व या सेल परत आत पाठवून कॅन्सरच्या पेशींचा नाश त्या करण्यास सक्षम केल्या जातात. भारताला उत्तम तंत्रज्ञानांची आणि तितक्याच चांगल्या उपचारांची आवश्यकता आहे. मी स्वत: मराठी शाळेत शिकलो पण काही बिघडले नसल्याचे ते म्हणतात उपस्थित मान्यवरांनी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट केला.
कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले, एसएमबीटी कॅम्पसमध्ये आजचा क्षण हा चिरस्मरणीय आहे. एसएमबीटीने एक नवा टप्पा गाठला आहे. देशातील दर्जेदार उपचार इथे होत आहेत याचा अभिमान आहे. एसएमबीटी केवळ हॉस्पिटल नसून १० ते १२ हजार लोकसंख्येचे गाव आहे. एसएमबीटीमुळे परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. एसएमबीटीने खूप नावलौकिक मिळवावा खूप पुढे जावे असे म्हणत येथे काम करणाऱ्या प्रत्येकाच्या कष्टाचे हे फळ असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी, माजी विधानसभा सदस्य डॉ. सुधीर तांबे यांच्यासह डॉ. जयश्री थोरात यांनीही उपस्थितांना संबोधित केले.
प्रारंभी, एसएमबीटी केअर प्लस म्हणजेच २०० बेड्सचे सुसज्ज असे स्पेशल रूमच्या विंगचे डॉ. माशेलकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यानंतर याच विंगमध्ये असलेल्या बोन मरो ट्रान्सप्लांटचे उद्घाटन कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. नव्याने बांधकाम होणाऱ्या एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युटचा दिमाखात भूमिपूजन सोहळा याठिकाणी पार पडला. एसएमबीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानावर टेलीहेल्थ आणि ई-कॅम्पसचे ऑनलाईन स्वरुपात उद्घाटन झाले.
प्रास्ताविकात व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे यांनी एसएमबीटी हॉस्पिटलचा प्रवास उलगडत अनेक यशस्वी टप्प्यांबाबत सांगितले. याप्रसंगी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ. एस. डी. बनवली, डॉ. पंकज चतुर्वेदी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, इम्युनोअक्टचे संस्थापक डॉ. राहुल पुरवार, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, कर्करोग तज्ञ डॉ. हसमुख जैन, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, मेटच्या शेफाली भुजबळ, विजय करंजकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बोन मॅरो ट्रान्सप्लांट व कार-टी सेल थेरपीला एसएमबीटीत सुरुवात… सेल आणि जीन थेरपीमध्ये गेल्या दहा वर्षात खूप संशोधन झाले आहे. इतर देशात हि थेरपी सुरु आहे; मात्र तिथे खर्च खूप मोठा आहे. कमीत-कमी खर्चात भारतात असे संशोधन झालेले आहे. आजपासून इम्युनोअक्ट थेरपी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे सुरु झाल्याचे इम्युनोअक्टचे संस्थापक डॉ. राहुल पुरवार यांनी जाहीर केले. याआधी झालेल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये दोन रुग्णांवर ही थेरपी यशस्वी करण्यात आली आहे.
एसएमबीटी व टाटा उभारणार २०० खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल… आज भूमिपूजन झालेले एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये टाटा मेमोरियल सेंटरच्या तांत्रिक मार्गदर्शनाने २०० बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल लवकरच साकारले जाणार आहे. टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ पंकज चतुर्वेदी यांनी एसएमबीटी वटवृक्ष असल्याचे म्हणत यापुढे सर्वकाही सहकार्य एसएमबीटीसाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन वर्षापूर्वी जेव्हा करार झाला त्यानंतर वाटले नव्हते एसएमबीटी एवढे मोठे काही करू शकेल असे म्हणत टाटा मेमोरियल सेंटरपेक्षाही मोठे हॉस्पिटल एसएमबीटी होऊ शकते असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 579
एस एम बी टी हॉस्पिटल डॉक्टर रघुनाथ माशेलकर डॉक्टर हर्षल तांबे बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अपघातात जीव गमावलेल्या सभासदांच्या कुटुंबांना थोरात कारखान्याचा मोठा आधार! चार वारसांना प्रत्येकी २ लाखांची मदत

27/10/2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्याचा विकासाचा वेग कायम राखणार: आमदार सत्यजित तांबे

26/10/2026

एसएमबीटीचा स्तुत्य उपक्रम | दोन वर्षात २४ डोहाळे जेवण; मोफत १८ हजार सोनोग्राफी आणि दोन हजार महिलांच्या प्रसूती

25/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार २९ ऑक्टोंबर २०२६ — कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar29/10/20260

आजचे राशिभविष्य – मेष- आजचा दिवस आपल्यासाठी उत्साही आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन आला आहे. रखडलेली…

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

28/10/2026

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

28/10/2026

आज बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६, आजच्या दिवसाचे राशिभविष्य –

28/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.