Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » २३०० स्पर्धकांच्या जल्लोषात क्रीडास्पर्धा; एकविरामुळे विद्यार्थिनी, महिलांना क्रीडा स्पर्धेचे मोठे व्यासपीठ उपलब्ध : आमदार बाळासाहेब थोरात
क्रिडा व कला

२३०० स्पर्धकांच्या जल्लोषात क्रीडास्पर्धा; एकविरामुळे विद्यार्थिनी, महिलांना क्रीडा स्पर्धेचे मोठे व्यासपीठ उपलब्ध : आमदार बाळासाहेब थोरात

चार दिवस चालणार स्पर्धा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/03/2024Updated:08/03/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दि. ८ मार्च
प्रत्येक क्षेत्रात महिलांनी केलेली कामगिरी ही अभिमानास्पद आहे. याच पार्श्वभूमीवर क्रिकेटमध्ये देखील भारतीय मुलींची कामगिरी देशवासीयांसाठी अभिमानास्पद ठरत आहे. कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून एकविराच्यावतीने सुरू झालेल्या महिला क्रिकेट व विविध क्रीडा स्पर्धांमुळे तालुक्यातील मुली व महिलांसाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाले असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात एकविरा फाउंडेशनच्यावतीने महिला टेनिस बॉल क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी समवेत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, पद्मा थोरात, सुनंदा जोर्वेकर, शितल उगलमुगले, एकविराच्या डॉ. प्रा. वृषाली साबळे, सुरभी मोरे, शर्मिला हांडे, तृष्णा औटी, काँग्रेसच्या क्रीडा व युवक सेलच्या समिता गोरे, अहिल्या ओहोळ, प्राजक्ता घुले, पूजा गाडेकर, सुरभी आसोपा, डॉ. विशाखा पाचोरे, किरण गुंजाळ, मयुरी थोरात, अर्चना नवले, शीला पंजाबी, श्रीराम कुर्हे, सत्यजित थोरात, पराग थोरात, मिलिंद औटी, अंबादास आडेप, सुनील सांगळे, ॲड. सुहास आहेर आदींसह महिला उपस्थित होत्या.महिला दिनानिमित्त मोठ्या उत्साहात आणि आनंदात सुमारे २३३० विद्यार्थिनी व महिलांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धांना प्रारंभ झाला. क्रिकेटच्या ३० यार्ड सर्कलवर उभे राहून सर्व खेळाडू महिलांनी यावेळी पाहुण्यांना मानवंदना दिली. अत्यंत उत्साह आणि जल्लोषमय वातावरणात क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेचा प्रारंभ झाला.
थोरात म्हणाले, जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून मागील पाच वर्षात महिला सबलीकरण व महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. महिलांच्या विविध स्पर्धा आयोजनात यावर्षीही भव्य महिला क्रिकेटचा थरार संगमनेरमध्ये होणार आहे. तालुक्यातील ७१ संघांचा सहभाग हा आनंददायी आहे. महिलांनी विविध क्षेत्रात मिळवलेले यश आणि केलेली कामगिरी ही अभिमानास्पद असून क्रिकेटमध्ये ही मुलींना मोठी संधी आहे. या क्षेत्रामध्ये आता नव्याने करिअरच्या वाटा उपलब्ध झाल्या आहेत.
एकविरा फाउंडेशनने सुरू केलेल्या या स्पर्धेचा ग्रामीण भागातील मुलींना नक्कीच लाभ होणार असून विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोबाईलपेक्षा मैदानाकडे वळले पाहिजे. मैदानी खेळ हे आरोग्यासाठी चांगले असून क्रिकेटमधून सांघिक भावनेसह अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागते.
डॉ. तांबे म्हणाले, महिला सक्षमीकरता सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून शिक्षणाबरोबर क्रीडा स्पर्धांमधूनही मुलींनी सहभाग घेऊन स्वतःला सशक्त बनवावे.
दुर्गाताई तांबे म्हणाल्या, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे सांस्कृतिक व वैभवशाली शहर म्हणून राज्यात ओळखले जाते. एकविराच्या महिलांच्या क्रिकेट सामन्यांमधून महिला व विद्यार्थिनींनी घेतलेला मोठा उत्स्फूर्त सहभाग हा अत्यंत आनंददायी आहे. ही स्पर्धा राज्यभरातील मुलींसाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण होईल.
प्रास्ताविकात डॉ. जयश्री थोरात यांनी एकविरा फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती देताना या स्पर्धेमध्ये क्रिकेट, रस्सीखेच स्पर्धेबरोबरच महिलांची आरोग्य तपासणी व विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वृषाली साबळे यांनी केले तर डॉ. विशाखा पाचोरे यांनी आभार मानले.
क्रिकेटमध्ये ७१ संघांचा सहभाग… अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच महिला क्रिकेटच्या स्पर्धा होत असून संगमनेर तालुक्यातील विविध गावे व विद्यालयांमधील ७१ क्रिकेट संघ, रस्सीखेचसाठी ६५ संघ सहभागी झाले. स्पर्धा चार दिवस सुरू राहणार असून सर्वांसाठी मोफत प्रवेश आहे. सर्व संघांना कॅप व कीट देण्यात आली असून अत्यंत अत्याधुनिक सुविधा, प्रेक्षकांसाठी गॅलरी, हिरवे मैदान यामुळे ही स्पर्धा रंगतदार ठरणार असून षटकारा चौकारांच्या वेळी ढोल ताशांच्या गजराने मैदान दुमदुमून जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,282
एकविरा फाउंडेशन जयश्री थोरात दुर्गाताई तांबे बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

By Annant Ppangarkar04/10/20260

बाळासाहेब घोडके- शिवसेना हे चार अक्षरी नाव उच्चारताच मनात एक झंझावात उभा राहतो. वंदनीय बाळासाहेब…

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.