Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पत्नीने लाखाची लाच मागितली, पतीने पन्नास हजार स्वीकारले; क्लासवन डॉक्टर दांपत्यावर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

पत्नीने लाखाची लाच मागितली, पतीने पन्नास हजार स्वीकारले; क्लासवन डॉक्टर दांपत्यावर गुन्हा दाखल

लाखात पगार तरीही पैशाचा मोह सुटेना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/03/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दि. ९ मार्च

रक्तपेढीच्या तपासणीत त्रुटी न काढण्यासाठी रक्तपेढी चालकाकडे एक लाख दहा हजाराची लाच मागणाऱ्या उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी असलेल्या अस्थिरोगतज्ञाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. अश्विनी किशनराव गोरे (वय ४२ वर्षे) व डॉ. प्रितम तुकाराम राऊत (वय ४८ वर्षे, दोघे रा. क्वॉटर्स क्र.३, क्लास १ क्वॉटर्स, सिव्हील हॉस्पिटल कॅम्पस, मारवाडी गल्ली, धाराशिव, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टर दांपत्याची नावे आहेत.

डॉ. अश्विनी गोरे या उदगीरच्या जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असून त्यांच्याकडे प्रादेशिक रक्त संक्रमण अधिकारी वर्ग १ या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांनी ७ मार्च २०२४ रोजी तक्रारदाराच्या डॉक्टर लेन नांदेड येथील रक्त केंद्राची (रक्तपेढी) भेट देऊन तपासणी केली होती. रक्त केंद्राची तपासणी झाल्यानंतर जातेवेळी त्यांनी रक्त केंद्राच्या तपासणीत त्रुटी न काढण्यासाठी एक लाख दहा हजार रुपये द्यावे लागतील, नाही तर तुमचे रक्तकेंद्र कायमचे बंद करण्याची कारवाई केली जाईल, असे सांगितले.

त्यामुळे तक्रारदार त्यांना आता सध्या पैसे नाहीत, असे सांगितल्याने डॉ. गोरे यांनी आता जेवढे आहेत तेवढे द्या असे सांगितले. गोरे यांनी मागितलेली रक्कम दिली नाही तर ते तक्रारदाराचे रक्त केंद्र बंद करतील या भीतीने तक्रारदाराने त्यांना दहा हजार रुपये दिले. त्यानंतर गोरे यांनी उर्वरित एक लाख रुपये शुक्रवारी देण्यास व ते पैसे घेण्यासाठी मी माणूस पाठवते असे तक्रारदाराला सांगितले.

डॉ. गोरे यांनी मागितलेली लाच देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. त्यामुळे शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारदारास लाच मागणीच्या पडताळणीसाठी आरोपी लोकसेविका डॉ. अश्विनी गोरे यांच्या मोबाईलवर पंचासमक्ष कॉल लावला असता, डॉ. गोरे यांनी कॉल उचलला नाही. त्यानंतर लगेच तक्रारदार यांना एक कॉल आला व त्याने सांगितले की, मला डॉ. अश्विनी गोरे मॅडम यांनी तुम्हाला भेटण्यास सांगितले आहे. तुम्ही नांदेडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर या, असे सांगितले.

त्यानंतर पथकाने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सापळा लावला. ठरलेल्या ठिकाणी एक इसम आला व त्याने मला डॉ. अश्विनी गोरे मॅडम यांनी पाठविले आहे असे सांगितले. तेव्हा तक्रारदाराने डॉ. अश्विनी गोरे यांना खात्री करण्यासाठी पंचासमक्ष मोबाईलवर कॉल केला असता, त्यांनी तक्रारदारास तेथे माळी आलेले आहेत. आणले का, किती आणले, त्यांना द्या, असे म्हणाल्या. तेव्हा तक्रारदार यांनी ५०,००० रुपये आणलेले आहेत असे सांगितले असता, डॉ. गोरे यांनी तुम्ही दिलेला शब्द पाळा, ठरल्याप्रमाणे दया असे सांगितले.

तेव्हा तक्रारदाराने आज सुट्टीचा दिवस आहे. पैसे जमवाजमव करायला वेळ लागेल असे सांगितले. तेव्हा गोरे यांनी ठिक आहे, माझे माणसाकडे दया असे म्हणून फोन कट केला. त्यानंतर तक्रारदाराने तेथे आलेल्या डॉ. प्रितम राऊत यांना पैसे घेवून येतो असे सांगून परत आला. त्यानंतर तक्रारदाराने पुन्हा राऊत यांची पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर भेट घेत लाचेची ५० हजार रुपयांची रक्कम त्यांच्याकडे सोपविली. तक्रारदाराने इशारा करताच सापळा अधिकाऱ्यांनी लगेचच छापा टाकत डॉ. प्रीतम तुकाराम राऊत यांना पकडत ताब्यात घेतले. डॉक्टर दांपत्याविरुद्ध वजीराबाद (जि. नांदेड) येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक गजानन बोडके, पोलीस नाईक राजेश राठोड, पोलीस कॉन्स्टेबल स. खदीर, पोलीस कॉन्स्टेबल बालाजी मेकाले, पोलीस कॉन्स्टेबल अर्शद खान, प्रकाश मामुलवार यांच्या पथकाने कारवाई केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,136
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.