Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोकसभा निवडणूक कर्तव्यात कुठल्याही चुका नकोत; आदर्श आचारसंहितेची यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
प्रशासन

लोकसभा निवडणूक कर्तव्यात कुठल्याही चुका नकोत; आदर्श आचारसंहितेची यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

शिर्डी, अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अधिकाऱ्यांना निर्देश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दि. १९ मार्च, अहमदनगर

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याने ६ जून पर्यंत आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.

शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदार संघातील आचारसंहिता अंमलबजावणीच्या पूर्वतयारी संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नेहरू सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य अधिकारी संभाजी लांगोरे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, शासकीय मालकीची कार्यालये, शासकीय वास्तूंच्या भिंतीवरील जाहिराती, भिंतीपत्रके, पोस्टर्स, बॅनर, कटआउट, होर्डिंग, झेंडे आदी तात्काळ काढली जावेत. बसस्थानक, बसथांबा, रेल्वे पुल, एसटी महामंडळाच्या बसेस, विद्युत व टेलिफोन खांबांवरील जाहिराती त्वरित काढून घेणे बंधनकारक आहे. याबाबत संबंधित यंत्रणेने तातडीने कार्यवाही करावी.

मालमत्ता विद्रूपीकरण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा-१९९५ मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. शासकीय संकेतस्थळावरील, राजकीय व्यक्तींचे छायाचित्र तसेच नावे वगळण्याची कारवाई करावी. बांधकाम व विकासासंदर्भातील माहिती संबंधित विभागाने तात्काळ जिल्हा निवडणूक शाखेकडे कळवावी.

आचारसंहिता काळात सर्व यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे तसेच निवडणूकीतील कामांची सर्व माहिती ठेवावी. लोकसभा निवडणूकीच्या कर्तव्यात कुठल्याही चुका होता कामा नये.

संभाव्य टंचाई परिस्थतीमध्ये टंचाई निवारणाची कामे फक्त शासकीय यंत्रणेमार्फत होणे अपेक्षित आहे. आचार संहिता काळात चुकीची माहिती पसरविण्यात आली तर त्याबाबत सत्यता तात्काळ तपासून त्याचा अहवाल सादर करावा. मतदार याद्यांमध्ये काही त्रृटी राहिल्यास त्या तात्काळ दूर कराव्यात असे सांगितले.

जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी आचार संहिता काळात जिल्हयातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी तत्पर राहून काम करावे, असे सांगितले.

आदर्श आचारसंहिता व तिची अंमलबजावणी, संदर्भातील सर्व बाबींच्या माहितीचे सादरीकरण, उपजिल्हाधिकारी शाहू मोरे यांनी केले. अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी सिव्हीजील ॲप व ॲप्लीकेशनबाबत माहिती दिली. या बैठकीस निवडणूक कामकाज संदर्भातील सर्व नोडल अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 579
आचारसंहिता लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.