Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जोर्वे नाक्यावर पुन्हा राडा, क्रिकेट मॅच खेळून घराकडे परतणाऱ्यांवर हल्ला; गुन्हा दाखल
गुन्हेगारी

जोर्वे नाक्यावर पुन्हा राडा, क्रिकेट मॅच खेळून घराकडे परतणाऱ्यांवर हल्ला; गुन्हा दाखल

वारंवार घडणाऱ्या घटनांना पोलीस प्रशासनाने पायबंध घालण्याची आवश्यकता
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार दि. २१ मार्च, संगमनेर

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादात असलेल्या जोर्वे नाका पहाटेच्या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. क्रिकेटची मॅच खेळून आपल्या जोर्वे गावाकडे परतणाऱ्या मुलांवर हल्ला करण्यात आला आहे. या मुलांना त्यांच्याकडील बॅटनेच बेदम मारहाण केल्याचा प्रकार पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदूर शिंगोटे (ता. सिन्नर, नाशिक) येथे सुरू असलेल्या क्रिकेटच्या मॅच संपवून काही मुले घराकडे परतत असताना तीन बत्ती चौक ते जोर्वे नाका परिसरात त्यांना अडवून मारहाण करण्यात आली. या संदर्भात साई महेश जाधव यांच्या तक्रारीवरून एका दुचाकी चालकासह सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधव याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादीसह जोर्वे येथील क्रिकेट खेळणारी मुले २० मार्चला नांदूर शिंगोटे येथे नाईट क्रिकेट मॅच खेळण्यासाठी गेले होते. क्रिकेट मॅच संपल्यानंतर हे सर्वजण आपल्या दुचाकीवरून गावाकडे परतत होते. मध्यरात्री बस स्थानकाकडून जोर्वे नाक्याकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुणांनी या तरुणांकडे बघत रागाने खुन्नस देण्याचा प्रयत्न केला. पुढे जोर्वे नाक्यावर पोहोचल्यानंतर या दोघांनी या मुलांच्या दुचाकीला आपली दुचाकी आडवी घातली.

एम. एच. १७ सीपी ६०२८ या दुचाकीवरील तरुणांनी त्यांना नारेबाजी कोणी केली, असे म्हणत शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरुवात केली. पाठोपाठ त्यांच्यासह त्यांच्या मदतीसाठी तेथे आलेल्या आणखी काही जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण देखील केली. तर एकाने त्यांच्याकडील क्रिकेट बॅट हिसकावून घेत या बॅटने मारहाण केली. त्यामुळे आरडाओरडा ऐकून जमलेल्या लोकांनी या सर्वांना पोलीस ठाण्यात आणले होते. त्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,625
पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.