Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये तरुणाचा खून, ३ तासातच पोलिसांनी केली खुनाची उकल… दोघे संशयित ताब्यात!
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये तरुणाचा खून, ३ तासातच पोलिसांनी केली खुनाची उकल… दोघे संशयित ताब्यात!

कौटुंबिक कारणातून वस्तीतील मित्रांनीच दारू पाजून काढला काटा!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/03/2024Updated:23/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार दि. २३ मार्च, संगमनेर

तालुक्यातून जाणाऱ्या कोल्हार घोटी मार्गावर समनापुर लागत असलेल्या हॉटेल नेचर जवळील मैदानात २३ वर्षीय तरुणाचा गळा कापून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे तणावपूर्ण परिस्थिती असताना पोलीस अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत अवघ्या तीन तासात या खून प्रकरणाचा उलगडा केला. या संदर्भात दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून कौटुंबिक कारणातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

शनिवारी सकाळी हॉटेल नेचर जवळील मैदानात खून झालेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक निरीक्षक विश्वास भान्सी यांच्यासह पोलीस पथकाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या काही मिनिटातच या तरुणाची ओळख पटवत पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.

अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेमुळे संगमनेरात निर्माण झालेल्या विविध चर्चांमुळे पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस यंत्रणेने बारकाईने तपास करत परिसरातील काही ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता खून झालेल्या तरुणांसोबत आणखी काहीजण असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळापासून जवळच काही अंतरावर पोलिसांना दारूच्या बाटल्या, चाकू, काडेपेटी, चपला आढळून आल्या. त्याच्या सोबतच्या तरुणांची नावे निष्पन्न करत पोलिसांनी त्यांच्या मागावर उपनिरीक्षक रमेश पवार, सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, राहुल डोके, साईनाथ पवार, विशाल करपे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी, आत्माराम पवार, हरिश्चंद्र बांडे, अजित कुऱ्हे आदींचा समावेश असलेले दोन तपास पथके आरोपीच्या मार्गावर पाठविली.

पोलीस पथकांनी काही वेळातच संशयित आरोपी सागर रमेश मुळेकर आणि राजेश मनोज मकवाणी या दोघांना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत या दोघांनी त्यांचा मित्र अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत याचा कौटुंबिक कारणातून शुक्रवारी रात्री दारू पाजून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शहर पोलीस ठाण्यात आरोपीं विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,246
पोलीस समनापुर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

By Annant Ppangarkar10/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: इतर कोणत्याही सत्ता पद्धतीमध्ये स्वातंत्र्याला स्थान नसून ते फक्त…

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.