Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी संगमनेरमधील उद्योजक अमित पंडितच्या कोठडी संदर्भात न्यायालयाने घेतला हा निर्णय
गुन्हेगारी

नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी संगमनेरमधील उद्योजक अमित पंडितच्या कोठडी संदर्भात न्यायालयाने घेतला हा निर्णय

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार दि. २४ मार्च, अहमदनगर

अहमदनगरमधील बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गेल्या आठवड्यात संगमनेरमधून अटक केलेल्या उद्योजक अमित पंडित याची जिल्हा न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठाडीत रवानगी केली आहे. त्यामुळे आता पंडितला जामीन मिळण्याची चिन्हे निर्माण झाले आहे.

नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यात संचालकांसह काही कर्जदार देखील आरोपींच्या पिंजऱ्यात अडकले आहे. संगमनेरमधील उद्योजक आणि अमृतवाहिनी बँकेचा काही काळ अध्यक्ष असलेल्या अमित पंडितने ३३ कोटी रुपयाहून अधिक रकमेचा कर्जघोटाळा केल्याचे बोलले जाते. फॉरेन्सिक ऑडिट नंतर आरोपींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून आत्तापर्यंत या घोटाळ्यामध्ये १०५ आरोपी निष्पन्न झाले आहे. बडा कर्जदार असलेल्या पंडितचाही समावेश आहे.

गेल्या आठवड्यात शनिवारी (ता. १६ मार्च) संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या आदेशावरून राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने पंडितला अटक करत न्यायालयासमोर उभे केले असता २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली होती.

रविवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पंडितला पुन्हा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने ६ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले आहेत. पोलीस कोठडी दरम्यान पंडित यांच्याकडून काय माहिती उपलब्ध झाली हे अद्याप समोर आलेले नाही.

एका बँकेचे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेऊन ते थकीत करायचे, कंपनीच्या नावाचे कर्ज फेडण्यासाठी फसवणूक करून पत्नी व मुलाच्या नावाने कर्ज घेऊन ते थकीत करायचे असा घोटाळा पंडितने घातल्याचे पोलीस तपासात व ‘फॉरेन्सिक ऑडिट’ अहवालात यापूर्वीच नमूद करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,154
अमित पंडित आर्थिक गुन्हे शाखा न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.