Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे १७ उमेदवार जाहीर; सेना-काँग्रेस-भाजपातून पुन्हा सेनेत आलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांना शिर्डीतून उमेदवारी
राजकारण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे १७ उमेदवार जाहीर; सेना-काँग्रेस-भाजपातून पुन्हा सेनेत आलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांना शिर्डीतून उमेदवारी

महायुतीच्या उमेदवाराकडे लागले लक्ष णे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार दि. २७ मार्च, मुंबई

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या सतरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत मुंबईतील उमेदवारांसह राज्यातील उमेदवार जाहीर करण्यात आल्याने या जागा शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याचे स्पष्ट झाले आहे. शिर्डीतून शिवसेनेने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

२००९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून खासदार झालेल्या वाकचौरे यांनी शिवसेनेचे गद्दारी करत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी केली होती. वाकचौरे यांच्या गद्दारीचे पडसाद त्यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमटले होते परिणामी अवघ्या १७ दिवसात या मतदारसंघाचे खासदार होण्याची संधी शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार सदाशिव लोखंडे यांना मिळाली होती. मधल्या काळात वाकचौरे यांनी भाजपचे कमळदेखील हाती घेत श्रीरामपूरमधून विधानसभा निवडणूक लढवली. एकदा अपक्ष म्हणून मैदानात उतरत पुन्हा नशीब आजमावले मात्र २००९ चा अपवाद वगळता त्यांना एकदाही यश आले नाही.

वाकचौरे यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा मातोश्रीवर जात शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या उमेदवारीला मोठा विरोध असताना देखील पक्षाने त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता वाकचौरे यांची लढत कोणाशी होते हे लवकरच स्पष्ट होईल.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या X हँडलवर जाहीर झालेल्या उमेदवारांची यादी दिली आहे. यात बुलढाणा, यवतमाळ-वाशिम, सांगली, हिंगोली, संभाजीनगर, धाराशिव, शिर्डी, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग, परभणी, ठाण्यासह मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे.

शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार – —

  1. बुलढाणा – प्रा. नरेंद्र खेडेकर
  2. यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
  3. मावळ – संजोग वाघेरे पाटील
  4. सांगली – चंद्रहार पाटील
  5. हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
  6. संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
  7. धाराशीव – ओमराजे निंबाळकर
  8. शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
  9. नाशिक – राजाभाऊ वाजे
  10. रायगड – अनंत गीते
  11. सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
  12. ठाणे – राजन विचारे
  13. मुंबई ईशान्य – संजय दिना पाटील
  14. मुंबई दक्षिण – अरविंद सावंत
  15. मुंबई वायव्य – अमोल कीर्तिकर
  16. मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
  17. परभणी – संजय जाधव

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..
*मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
इतर 16 उमेदवार… pic.twitter.com/nPg2RHimSF

— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2024

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवारांची यादी

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 787
लोकसभा निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यादी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.