बुधवार दि. २७ मार्च
लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने बुधवारी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय व राज्यातील ४० नेत्यांचा यात समावेश आहे. भाजपसह मित्र पक्षांमधील नेत्यांचा देखील या यादीत समावेश आहे.
राज्यात महायुतीमध्ये असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. जगत प्रकाश नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण, देवेंद्र फडणवीस, नुकतेच भाजपवासी झालेले अशोक चव्हाण यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले, नारायण राणे, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील यांचा देखील यात समावेश आहे.
महाराष्ट्रात महायुतीने ४५+ चे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी राज्यात भाजपाच्या प्रचाराची धुरा या ४० स्टार प्रचारकांवर राहणार आहे.
असे आहेत भाजपाचे स्टार प्रचारक…
पंतप्रधान नरेंद्र मोदी, जगत प्रकाश नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, प्रमोद सावंत, भूपेंद्र भाई पटेल, विष्णु देव साई, डॉ. मोहन यादव, भजनलाल शर्मा, एकनाथ शिंदे, अजित पवार, रामदास आठवले, नारायण राणे, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य सिंधिया, स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, शिवराज सिंह चव्हाण, देवेंद्र फडणवीस, सम्राट चौधरी, अशोक चव्हाण, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, ॲड. आशिष शेलार, पंकजा मुंडे-पालवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, पियुष गोयल, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, के. अन्नामलाई, मनोज तिवारी, रवी किसन, अमर साबळे, डॉ. विजयकुमार गावित, अतुल सावे व धनंजय महाडिक.



