Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डीत वाकचौरे यांच्या उमेदवारीने ‘मविआ’त नाराजी, उत्कर्षा रुपवतेंच्या भूमिकेकडे व माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या आजच्या न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष!
राजकारण

शिर्डीत वाकचौरे यांच्या उमेदवारीने ‘मविआ’त नाराजी, उत्कर्षा रुपवतेंच्या भूमिकेकडे व माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या आजच्या न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष!

शिर्डीतही यावेळी बंडखोरी होणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/03/2024Updated:28/03/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार दि. २८ मार्च – अनंत पांगारकर 

बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शिर्डी लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्याने शिर्डीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वाकचौरे यांना मोठा विरोध होत असल्याने या मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असलेल्या व त्यादृष्टीने तयारी करणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवतेंच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. रुपवते यांची बंडखोरी झाली तर ती वाकचौरेंसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेशी गद्दारी करत आता पुन्हा उमेदवारीसाठी मातोश्रीच्या पायऱ्या चढणाऱ्या वाकचौरे यांचा अपवाद वगळता शिवसेनेकडे दुसरा उमेदवार नव्हता. शिवसेनेतीलच एका गटाचा हात धरत वाकचौरे पुन्हा ‘मातोश्री’ची पायरी चढले खरे पण त्यांच्या समोरील संकटाचा डोंगर कायम आहे. वाकचौरे यांना उमेदवारी देऊ नये असा सुरुवातीपासूनच ठाकरे गटातील निष्ठावंतांनी लावून धरला होता. आता त्यांनी उमेदवारी मान्य केले असली तरी देखील वाकचौरे यांच्या बद्दल महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात असल्याने ते या जागेवर शिवसेनेकडून शिंदे गट प्रबळ दावेदार मानले जातात. लोखंडे यांची उमेदवारी या मतदारसंघात कायम राहिली तर दोघांच्याही शिवसेनेतील कोलाटउड्या बघता या मतदारसंघात ‘गद्दार विरुद्ध गद्दार’ असा सामना होणार असून त्याचा फायदा तिसऱ्याच एखाद्या उमेदवाराला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या रूपवते यांनी जर बंडखोरी केली तर वाकचौरे लोखंडे यांचे गणित बिघडून ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ संभवतो.

त्यातच या मतदारसंघात आता नव बौद्ध संघर्ष देखील उभा राहिला आहे. बौद्ध धर्मातील उमेदवाराला या मतदारसंघात डावलले गेले असल्याचा देखील आरोप असून आता बौद्ध धर्मातील उमेदवाराला उमेदवारी मिळावी असा मतप्रवाह समोर येत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील शिर्डीतून लढण्यास पुन्हा इच्छुक ते देखील काय भूमिका घेतात हे येत्या काळात दिसेल. त्यातच रुपवते यांनी आता आपल्या समाज माध्यमावरून काँग्रेसचे चिन्ह व मविआ नेत्यांचा उल्लेख हटविला आहे. त्यामुळे त्या या मतदारसंघातून उमेदवारी करतील असे देखील अपेक्षा आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात वाकचौरे व्हर्सेस लोखंडे असा सामना दिसत असला तरी एक जण तूप तर दुसरा सॅनिटरी नॅपकिन घोटाळ्यात अडकला आहे. लोखंडे यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे धूसर असून या मतदारसंघातून आज गुरुवारी येणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयानंतर माजी मंत्री बबनराव घोलप देखील प्रबळ दावेदार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यातच हा मतदारसंघ राज्याचे महसूल मंत्री व पंतप्रधान मोदी गृहमंत्री शहा यांच्याशी जवळीक असलेले भाजपाचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असल्याने त्यांचे देखील भूमिका महायुतीचा उमेदवार ठरविण्यात निर्णायक ठरणार आहे. लोखंडे यांच्या नावाला विखे यांची देखील संमती नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे न्यायालयाचा अपेक्षित निर्णय आल्यास घोलप शिंदे गटाकडून भाजपाच्या चिन्हावर या मतदारसंघात निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे समोर महायुतीचा उमेदवार कोण असेल हे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच उत्कर्षा रुपवते आपला निर्णय जाहीर करतील असे दिसते.

मतदार संघाच्या पुनर्रचनेपासून झालेल्या तीन निवडणुकांपासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र या मतदारसंघातील दोन्ही खासदार आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर वाकचौरे यांच्या विरोधात असलेली नाराजी पाहता काँग्रेसला ही जागा द्यावी अशी मागणी उत्कर्षा रूपवते यांनी केली आहे. दरम्यान रुपवते यांची मनधरणी करण्यात यश येते का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. शिर्डी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची ताकद अल्प आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात काय भूमिका स्पष्ट करतात याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 942
उत्कर्षा रुपवते बबनराव घोलप भाऊसाहेब वाकचौरे लोकसभा निवडणूक शिर्डी लोकसभा सदाशिव लोखंडे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.