Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वृत्तपत्रातील गुटख्याच्या बातमीवर कमेंट केली म्हणून शिवसेनेच्या दीपक साळुंखेना जीवे मारण्याची धमकी
गुन्हेगारी

वृत्तपत्रातील गुटख्याच्या बातमीवर कमेंट केली म्हणून शिवसेनेच्या दीपक साळुंखेना जीवे मारण्याची धमकी

अन्न औषध प्रशासन आणि पोलिसांच्या कृपेने संगमनेरात गुटख्याची खुलेआम विक्री सुरू!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार दि. २९ मार्च, संगमनेर

गुटक्याच्या अनुषंगाने प्रकाशित झालेल्या बातम्यांवर समाज माध्यमातून कमेंट करणाऱ्या शिवसेनेच्या दीपक साळुंखे यांना बंदी असलेल्या गुटख्याची सर्रासपणे शहरात विक्री करणाऱ्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला. या संदर्भात विजय भागवत याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक दैनिकात गुटखा तस्करांकडून संगमनेरात राजरोसपणे गुटख्याची विक्री केली जाते. बंदी असलेला गुटखा संगमनेरात कोणत्याही पानटपरीवर सर्रासपणे मिळतो. पोलीस देखील अशा किरकोळ विक्रेत्यांवर वारंवार कारवाई करतात मात्र या सर्व प्रकारांमधील प्रमुख गुटका किंग असलेले विक्रेते पोलिसांना सापडत नाही किंवा जाणीवपूर्वक त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. या गुटक्यावर नियंत्रण ठेवणारे अन्न औषध प्रशासन नावाचे खाते अस्तित्वात आहे की नाही अशी शंका येण्याइतपत या खात्याचे काम सुरू असते. त्यामुळेच पोलीस आपल्या खिशात असल्याचे सांगत गुटका किंग म्हणून मिरवले जाणारे व्यावसायिक सर्रासपणे शहरातील छोट्या छोट्या विक्रेत्यांना गुटख्याची विक्री करत असतात.

या संदर्भात स्थानिक माध्यमातून बातम्या प्रसिद्ध होत असतात. या बातम्यांची कात्रणे समाज माध्यमातून फिरतात. त्यामुळे समाजातील लोक अशा प्रकारच्या बातम्यांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. अशाच पद्धतीने संगमनेर अकोले तालुक्यात कार्यरत असलेल्या गुटखा किंग बद्दल स्थानिक ‘साय दैनिक प्रवरातीर’ मधून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवर शिवसेनेचे दीपक साळुंखे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्याचा राग आल्याने विजय भागवत याने साळुंखे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

मंगळवारी (२६ मार्च) शहरातील गणेश नगर भागात हा प्रकार घडला. साळुंके गणेश नगर मधील आपल्या नातेवाईकांकडे गेले असता तेथे आलेल्या विजय भागवत याने वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांवर तुम्ही कमेंट का करता अशी विचारणा करत तुम्ही आमच्याकडे हप्ते मागतात असा खोटा आरोप केला. तसेच साळुंखे यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची फिर्याद साळुंखे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिले असून विजय भागवत यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान विजय भागवत याच्याविरुद्ध प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे त्याने संबंधित दैनिक ‘प्रवरातीर’च्या संपादकांनाही धमकावण्याचा प्रकार यापूर्वी घडला होता. राजरोसपणे शहरात अवैधरीत्या गुटखा विक्री करता यावी यासाठी विजय भागवत हा माध्यमांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करून पोलीस आपले काहीच करू शकत नसल्याचे सांगतो. त्यामुळे संबंधित यंत्रणेने या प्रकाराची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,175
गुटखा दीपक साळुंखे पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.