Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डीत आजी-माजी खासदारांच्या लढतीतील अडचणीत वाढ; राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार?
राजकारण

शिर्डीत आजी-माजी खासदारांच्या लढतीतील अडचणीत वाढ; राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार?

रुपवते यांच्या उमेदवारीने आजी-माजी खासदारांच्यात मत विभाजन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार दि.३० मार्च

शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीने आजी-माजी खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे या आजी-माजी खासदारात लढत निश्चित झाले असतानाच आता वंचितच्या रूपाने तिसरा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्य व काँग्रेस नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतल्याने त्यांच्या उमेदवारीच्या चर्चा मतदारसंघात सुरू झाल्या आहे.

२०२४ च्या निवडणुकीत बौद्ध उमेदवार हवा असा मतप्रवाह गेल्या काही दिवसापासून सुरू होता. त्यादृष्टीने रूपवते यांनी या मतदारसंघात भेटीगाठी घेत मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न देखील केला. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्राबल्यखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघ येत असल्याने या मतदारसंघात त्यांची भूमिका निर्णायक होती. २००९ च्या निवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे तत्कालीन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुढच्या २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी नाकारत काँग्रेसचा हात हातात घेतला होता. या निवडणुकीत त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

तसेच वाकचौरे यांच्यावर गद्दारीचा शिक्का बसला. मतदार संघातील मोठ्या विरोधामुळे नंतरच्या निवडणुकीतही पराभवामुळे त्यांना घरीच बसावे लागले होते. शिवसेना, काँग्रेस, भाजप, अपक्ष आणि पुन्हा शिवसेना असे पक्ष बदलणाऱ्या वाकचौरेंवर गद्दारीचा बसलेला शिक्का अद्यापही मतदारसंघात कायम आहे. त्या पाठोपाठ राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे त्यांच्यावरही गद्दारीचा शिक्का बसला आहे. राज्यातील निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून गद्दारीच्या मुद्द्यावर गाजणार असली शिर्डी लोकसभा मतदारसंघात मात्र ठाकरेंच्या उमेदवारावरही हाच शिक्का असल्याने या मतदारसंघात महाविकास आघाडी कोणत्या मुद्द्यावर प्रचार करते हे बघावे लागणार आहे. तर दुसरीकडे मतदार संघातून गायब असलेला खासदार अशी निर्माण झालेली लोखंडे यांची प्रतिमा त्यांना कितपत साथ देते हे देखील मतदान यंत्रातून समोर येईल.

या पार्श्वभूमीवर आमदार थोरात ही जागा पुन्हा काँग्रेसकडे आणण्यात यशस्वी होतील अशी शक्यता होती मात्र या मतदारसंघात शिवसेनेने माजी खासदारांना उमेदवारी दिल्याने ही शक्यता मावळली. त्यामुळे काँग्रेस कडून उमेदवारी करण्यास इच्छुक असलेल्या उत्कर्षा रूपवते यांच्यासमोर आता बंडखोरीचा मार्ग उरला आहे. या पार्श्वभूमीवर रूपवते यांनी शनिवारी मुंबईत राजगृहावर वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उत्कर्षा रूपवते वंचितच्या उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली आहे. रुपवते वंचितच्या उमेदवार म्हणून समोर आल्या तर या मतदारसंघात आजी-माजी खासदारांची मात्र चांगलीच अडचण होण्याची चिन्हे आहे. तर दोन्ही खासदारांवरील नाराजीचा फायदा महिला उमेदवार म्हणून रुपवते यांना कितपत मिळतो हे देखील समोर येईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,597
उत्कर्षा रूपवते प्रकाश आंबेडकर भाऊसाहेब वाकचौरे लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी सदाशिव लोखंडे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.