Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहमदनगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके मध्यरात्री बाळासाहेब थोरातांच्या भेटीला; दीड तासाच्या बैठकीत मिळाला विजयाचा कानमंत्र!
राजकारण

अहमदनगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके मध्यरात्री बाळासाहेब थोरातांच्या भेटीला; दीड तासाच्या बैठकीत मिळाला विजयाचा कानमंत्र!

नगरमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती सामना रंगणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार दि. ३१ मार्च

नगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी उमेदवारी मिळताच मध्यरात्री संगमनेर गाठीत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. दीड तासाच्या या भेटीत लंके यांनी थोरात यांच्याशी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून विजयाचा कानमंत्र घेत ते मतदार संघात परतले.

राज्यातील महत्त्वाच्या लढतीमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला गेली आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातील आमदार निलेश लंके यांना येथून उमेदवारी दिली. त्यासाठी दोनच दिवसांपूर्वी डंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.

निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नगर दक्षिण मधील लढत स्पष्ट झाली आहे. तर भाजपाने विद्यमान आमदार डॉ. सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. विखे व लंके यांच्यात या मतदारसंघात निकराची लढाई होत आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे या निवडणुकीला स्वरूप आले आहे. या पार्श्वभूमीवर लंके यांनी संगमनेरमध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख नेते थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी शनिवारी मध्यरात्री त्यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, पारनेरचे राहुल झावरे उपस्थित होते.

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना लंके म्हणाले… लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सुसंस्कारित राजकारण केले आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो. राजकारणामध्ये ज्या नेत्यांबद्दल सर्वांना आदर आणि आत्मीयता आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेत नवीन आमदारांना मदत व मार्गदर्शन करणारे आमदार थोरात हे लोकप्रिय नेते आहे. त्यांचा आशीर्वाद हा राजकारणात आणि समाजकारणात नव्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्यांच्या भेटीसाठी आलो.

थोरात म्हणाले… लंके यांची आमदारकीची यशस्वी आणि लोकप्रिय कारकीर्द राहिली आहे. सामान्य जनतेसाठी झटणारा, पळणारा कार्यकर्ता अशी त्यांची राज्यभर ओळख आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन काम सातत्याने करणारे हे नेतृत्व आहे. सर्वसामान्य नागरिक आणि युवकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे मोठे नाते आहे. नगर दक्षिणमध्ये समोरचे उमेदवार मोठे आहे मात्र हा लहान कार्यकर्ता असला तरी गुणी आहे. ही निवडणूक श्रीमंत विरुद्ध गरीबाची लढाई होणार असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लंके यांचे मोठे यश राहणार आहे. हे यश महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचे असेल. लंके हे नक्कीच विजय होतील, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,362
डॉक्टर सुजय विखे निलेश लंके बाळासाहेब थोरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.