Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाखो रुपयांच्या बनावट ताडीनंतर आता गांजा आणि गर्द (हेरॉईन) पकडले !
गुन्हेगारी

लाखो रुपयांच्या बनावट ताडीनंतर आता गांजा आणि गर्द (हेरॉईन) पकडले !

संगमनेर बनले अवैध धंद्याचे माहेरघर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार दि. २ एप्रिल

संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या शिवाजीनगर येथे छापा टाकून अहमदनगर गुन्हे शाखा आणि संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने गांजा आणि गर्द (हेरॉईन) विक्री करणाऱ्या अटक केली आहे.

नुकतीच पुणे पोलिसांनी संगमनेरमध्ये येऊन मोठी कारवाई करीत लाखो रुपयांचे बनावट ताडी करण्याचे साहित्य (केमिकल) छापा टाकून पकडले होते. त्यानंतर लगेचच अमली पदार्थांची ही दुसरी कारवाई संगमनेरात झाली आहे. सातत्याने होणाऱ्या या कारवायांमुळे संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे पितळ उघडे पडले असून नगर जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमुख केंद्र संगमनेर झाले असल्याचे दिसून येत आहे.

अंबादास शांताराम शिंदे, (रा. शिवाजीनगर, ता. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 5 लाख 17 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या छाप्यामध्ये पोलिसांनी 4 किलो 498 ग्रॅम गांजा आणि 36 ग्रॅम गर्द (हेरॉईन) जप्त केले आहे.

संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत राहणाऱ्या या इसमांकडून अमली पदार्थ विक्री केली जात असल्याची खबर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर संगमनेर शहर पोलिसांशी संपर्क करून शहर आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. संशयीताच्या घराची झडती घेतली असता संशयीत बसलेल्या पलंगाच्या खाली एका गोणीत उग्र वास येत असलेला गांजा बिया, बोंडे, काड्या, पाने संलग्न असलेला पाला मिळुन आला. तसेच त्याच्या पॅन्टच्या खिशात प्लॅस्टीक पिशवीत विटकरी रंगाची पावडर (गर्द) मिळून  आली.

आरोपी शिंदे विरुध्द संगमनेर शहर पोलीस स्टेशनला गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) ii, 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस  करीत आहेत.

सर्व अवैध धंद्यांचे केंद्र संगमनेर… संगमनेर शहर आणि तालुक्यात सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याचे वारंवार उघड होत आहे. अमली पदार्थ गांजा, गर्द याचबरोबर केमिकल द्वारे बनावट ताडी बनवणे हे तर उघड झाले आहेच. परंतु शहर आणि ग्रामीण भागात वाळू तस्करी, कत्तलखाने, गोवंश हत्या, गुटखा विक्री, मटका, जुगार असे अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याचे आढळून आले आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यात संगमनेर तालुका अवैध धंद्यांचे केंद्र बनला असल्याची चर्चा आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,377
पोलीस स्थानिक गुन्हे शाखा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्याचा विकास हा कष्टातून उभा राहिला असून केवळ मोबाईलवर अफवा…

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.