शुक्रवार दि. ५ एप्रिल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात ठाकरेंच्या भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीत मनसे भाजप युती होऊ शकते ही चर्चा अद्यापही कायम आहे. मात्र अद्यापही त्यासंदर्भात निर्णय होताना दिसत नाही. ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर नेमकं “काय घडलंय आणि काय घडतय” याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच आता राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या व मनसेच्या एक्स (X) हँडलवरून मनसैनिकांना साद घातली आहे.
येत्या नऊ तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी दादर मधील शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या गुढीपाडवा मेळाव्याचा ट्रेलर मनसेच्या एक्स हँडलवरून प्रदर्शित करण्यात आला आहे. “९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतय… हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायच आहे!”असं कॅप्शन यावर देण्यात आल आहे. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बघा मनसे आणि राज ठाकरेंनी आपल्या एक्सवर प्रदर्शित केलेला ट्रेलर नेमका काय आहे…
९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय… हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे ! #मनसे_पाडवामेळावा #MNSGudhiPadwaRally pic.twitter.com/OgImzXTSQX
— Raj Thackeray (@RajThackeray) April 5, 2024


