Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संपदा पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी वाफारे पती-पत्नीसह पाच जणांना जन्मठेप, अन्य १२ जणांना पाच ते दहा वर्षांची शिक्षा!
न्यायालय

संपदा पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी वाफारे पती-पत्नीसह पाच जणांना जन्मठेप, अन्य १२ जणांना पाच ते दहा वर्षांची शिक्षा!

अन्य पतसंस्थांमधील घोटाळेखोर हादरले!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/04/2024Updated:10/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, दि. १० एप्रिल –

अहमदनगर जिल्ह्यासह राज्यभरात बहुचर्चित ठरलेल्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या १३ कोटी ३८ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने वाफारे पती-पत्नीसह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर अन्य बारा जणांना वेगवेगळ्या कलमाखाली पाच ते दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. नाईकवाडी यांनी बुधवारी दोषी ठरलेल्या आरोपींना शिक्षा ठोठावली. तत्कालीन संस्थापक चेअरमन ज्ञानदेव सबाजी वाफारे याच्यासह त्याची पत्नी सुजाता ज्ञानदेव वाफारे, रवींद्र विश्वनाथ शिंदे, संजय चंपालाल बोरा व साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर यांचा जन्मठेप झालेल्या गुन्हेगारात समावेश आहे. तर उर्वरित बारा संचालक गुन्हेगारांना न्यायालयाने पाच ते दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

सुधाकर परशुराम थोरात, भाउसाहेब कुशाबा झावरे, उत्तमराव दगडू चेमटे, दिनकर बाबाजी ठुबे, विष्णूपंत गणपत व्यवहारे, राजे हसन अमीर, बबन देवराम झावरे, लहू सयाजी घंगाळे, हरिश्चंद्र सावळेराम लोंढे, अनुष प्रविण पारेख, मारूती खंडू रोहोकले, निमाजी खंडू रोहोकले, बबन खंडू रोहोकले, सुधाकर गोपीनाथ सुंबे, गोपीनाथ शंकर सुंबे, महेश बबन झावरे व संगिता हरिश्चंद्र लोंढे यांचा शिक्षा झालेल्या अन्य गुन्हेगारांमध्ये समावेश आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.आर. नाईकवाडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू न्यायाधीश नाईकवाडी यांनी संपदा पतसंस्थेच्या झालेल्या अपहार रक्कम १३ कोटी ३८ लाख ५५ हजार ६६७ रुपये प्रकरणी वेगवेगळ्या कलमांखाली या सर्व संचालक आरोपींना दोषी धरलेले आहे. सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने अनिल ढगे यांनी काम बघितले. तर या संदर्भात लेखा परिक्षक देवराम मारूतराव बारसकर यांनी वरील आरोपींविरूध्द १ ऑगस्ट २०११ रोजी कोतवाली पोलिस स्टेशन अहमदनगर येथे फिर्याद दिली होती.

काय होता फिर्यादीचा आरोप… 

फिर्यादीमध्ये विनातारण कर्ज नियमबाह्यरित्या कर्जदारांना वाटप करण्यात आलेले होते. तसेच सोने तारण कर्ज हेही नियमबाहय देण्यात आले होते. तसेच तत्कालीन संचालक मंडळाचे नातेवाईक व कर्मचारी यांनाही बेकायदेशीररित्या कर्ज वाटप करण्यात आलेले होते. वरील आरोपींनी सदर रक्कमेचा अपहार करून सदर रक्कम स्वतःच्या फायद्याकरिता वापरली होती. तसेच रकमेबाबत खोटया नोंदी करून सभासदास चुकीची माहिती देवून कायदेशिररित्या आर्थिक संस्था चालविताना ठेवीदाराच्या ठेवीचा विनीयोग बेकायदेशिरपणे अटी व नियम यांचे पालन न करता सभासदांच्या ठेवी परत करण्यास असमर्थता दर्शविली व ठेवीदारांचे रकमेची अफरातफर करून फसवणूक १३ कोटी ३८ लाख ५५ हजार ६६७ रुपये रकमेची फसवणूक केली.

सविस्तर निकालाचे वृत्त लवकरच देत आहोत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 4,497
जन्मठेप जिल्हा व सत्र न्यायालय ज्ञानदेव वाफारे संपदा पतसंस्था
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.