Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी खासदार वाकचौरे आणि कडवट शिवसैनिकांचे मनोमिलन! प्रचारात करणार मदत; माजी मंत्री आमदार ‘बाळासाहेब थोरातांचे’ही या कारणासाठी मानले आभार!
राजकारण

माजी खासदार वाकचौरे आणि कडवट शिवसैनिकांचे मनोमिलन! प्रचारात करणार मदत; माजी मंत्री आमदार ‘बाळासाहेब थोरातांचे’ही या कारणासाठी मानले आभार!

वाकचौरे यांची वाट अद्याप तरी खडतरच...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/04/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, दि. ११ एप्रिल 

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि कडवट शिवसैनिकांमधील वाद सध्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. त्यातच वाकचौरे यांनी पुन्हा मातोश्रीची दारे ठोठावत शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवारी मिळविण्यात यश मिळविले. मात्र या न्यायालयीन लढ्यामुळे शिवसैनिक वाकचौरे यांच्या प्रचारापासून चार हात दूर होते. संगमनेरमध्ये पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात या संदर्भातील खदखद समोर आल्यानंतर या सर्वांमध्ये मनोमिलन घडविण्यात यश आले आहे.

शिवसेनेसोबत गद्दारी करत २०१४ मध्ये काँग्रेस कडून लोकसभेसाठी उमेदवारी करणाऱ्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तत्कालीन शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, भाऊसाहेब हासे यांच्यासह काही शिवसैनिकांनी त्यांना भर रस्त्यात जाब विचारण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे हा प्रकार पोलीस ठाण्यातून थेट न्यायालयात जाऊन पोहोचला. गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणुकीत वाकचौरे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला बरोबरच हा वाद राज्यभरात चर्चिला गेला होता. वाकचौरे व कडवट शिवसैनिकांमधील वाद विकोपाला पोहोचल्याने त्याचे निवडणुकीत दूरगामी परिणाम दिसण्याची चिन्ह होती.

आधी दहा वर्षांपासून कोर्टाच्या फेऱ्या मारणाऱ्या शिवसैनिकांवरील गुन्हे मागे घ्या, तरच निवडणुकीत प्रचार करू, अशी उघडपणे भूमिका काही कडवट शिवसैनिकांनी घेतल्याने वाकचौरे यांची मोठी पंचायत झाल्याचे दिसत होते.

थोरात यांचे आभार तर वाकचौरे यांच्या विषयी नाराजी… 

बुधवारी संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून वाकचौरे यांच्या प्रचाराची दिशा ठरविण्यासाठी महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात कतारी यांनी तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने केलेल्या आंदोलनाचा दाखला देत या संदर्भात संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात भाऊसाहेब हासे विरोधात खटला सुरू आहे. अशा परिस्थितीत देखील थोरात यांनी मनाचा मोठेपणा दाखवत मदत करत पुढील काळात एकदिलाने काम करण्याचा संदेश दिला. याबद्दल त्यांनी थोरात यांच्या आभार मानले. मात्र असा प्रकार आमच्या नेत्याकडून म्हणजेच माझी खासदार वाकचौरे यांच्याकडून घडत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला.

मनोमिलन घडविण्यात यश…

त्यामुळे या मेळाव्यानंतर युवा सेनेचे तालुकाप्रमुख अक्षय रावसाहेब गुंजाळ यांनी कतारी, हासे यांच्यासह अन्य शिवसैनिक आणि वाकचौरे यांच्यात मध्यस्थी घडवून आणण्यासाठी माजी तालुकाप्रमुख ज्येष्ठ नेते रावसाहेब गुंजाळ यांच्या निवासस्थानी चर्चा घडवून आणली. या चर्चेत न्यायालयीन कामकाजात योग्य तो मदतीचा शब्द मिळाल्यानंतर मनोमिलन घडविण्यात पदाधिकाऱ्यांना यश आले. त्यानंतरच वाकचौरे यांच्यासाठी हे माजी पदाधिकारी प्रचारात सहभागी होण्याचे चिन्ह आहेत.

वाकचौरे यांची वाट खडतरच…

उमेदवारी मिळविण्यात, पक्षांतर्गत नाराजांची मोट बांधण्यात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यशस्वी झाले असले तरी निवडणुकीत मात्र त्यांची वाट खडतर असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी त्यांना मतदारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जावे लागणार आहे. पदाधिकाऱ्यांचे अंतर्गत वाद, जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्याकडून या वादाला घातले जाणारे खतपाणी या पार्श्वभूमीवर अंतर्गत कलहासोबतच बाहेर मतदारांची विनवणी करत आपली भूमिका मांडण्याचे कसब वाकचौरेना दाखवावे लागणार आहे. ते मतदारांना कसे सामोरे जातात, मतदार वाकचौरे यांच्याकडे कसे बघतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,214
अमर कतारी जिल्हा व सत्र न्यायालय बाळासाहेब थोरात भाऊसाहेब वाकचौरे लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.