Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गबरूची भटकंती… बैठकीतली तडफड आणि कानशील
महाराष्ट्र संवाद विशेष

गबरूची भटकंती… बैठकीतली तडफड आणि कानशील

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/04/2024Updated:14/04/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गबरूच्या देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरू आहे. गबरूच्या अंगातही निवडणुकीचे वारे संचारले आहे. त्यामुळे रात्री उशिराने झोपलेला गबरू सकाळी जरा उशिराच उठला मात्र त्याचा आळस रात्रीच्या जागरणामुळे दूर झाला नव्हता. तशाही अवस्थेत गबरूने आपला मोबाईल हातात घेत त्याचं इंटरनेट चालू केलं. आणि व्हाट्सअप मेसेज वाचू लागला. व्हाट्सअप ग्रुपवरचा एक मेसेज पाहिला आणि गबरूच्या अंगात पुन्हा निवडणुकीचे वार संचारलं. त्यामुळे गबरू घाईघाईनं अंथरुणातून दूर झाला आणि आपले सकाळचे विधी आवरू लागला. त्याची आंघोळ होऊन कपडे घालून तो हॉलमध्ये येईपर्यंत त्याच्या आईने त्याच्यासमोर नाश्ता आणून ठेवला. मात्र आईने आणलेला नाश्ता न घेताच दहा वाजल्याने तो घाई घाईने घराबाहेर पडला.

गबरूच्या गावात आज त्याच्या पक्षाच्या आघाडीचा निवडणूक आराखडा मेळावा होता. त्यामुळे गबरू घाई घाईने मेळावा असलेल्या लॉन्सकडे निघाला. एसटी स्टँड जवळ आल्यावर घरून नाश्ता न केलेल्या गबरूला चहाची तल्लप झाली आणि गबरू त्याच्या जिल्ह्याच्या नावाने फेमस असलेल्या नवीन रस्त्यावर आला. तसा चहावाला हा गबरूच्याच पक्षाचा. गबरूने चहावाल्या भाऊशी राजकीय गप्पा मारता मारता चहाचा आस्वाद घेतला. आणि गबरू तेथून तीन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या लॉन्सकडे मित्राच्या गाडीवर बसून मेळाव्यासाठी रवाना झाला.

तो मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचला. मेळाव्याच्या ठिकाणी गबरूच्या मित्र पक्षाशी आघाडी असलेले मोठे राज्यस्तरीय नेते (साहेब) उपस्थित होते. या नेत्यावर गबरूच्या पक्षातील एका कार्यकर्त्यांने काही वर्षांपूर्वी हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्या संदर्भात न्यायालयात केस सुरू आहे. आता हेच साहेब गबरूच्या मित्र पक्षांची आघाडी असलेल्या आघाडीचे प्रमुख असल्याने गबरूच्या पक्षाच्या उमेदवाराची त्यांच्यावरच मदार होती. जिल्ह्यातील आणखी काही नेते मंडळी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह व्यासपीठावर विराजमान झाली होती. मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना बैठक व्यवस्था असलेल्या ठिकाणी टाकलेल्या एका खुर्चीवर गबरू विराजमान झाला. आणि नेते मंडळाची भाषणे ऐकू लागला.

आपला पक्ष सत्तेत येण्याची आणि आपल्या उमेदवाराला निवडून देण्याची का गरज आहे, हे प्रत्येक जण भाषणातून सांगत सोबत आपलेही महत्त्व देखील पटवून देत होता. तेथे गबरूच्या पक्षाच्या ‘भाऊ’नेही जोरदार भाषण केले. भाषणात आपण या राज्यस्तरीय नेत्याला यापूर्वी विरोधी पक्षात असल्याने विरोध करत होतो. मात्र आता त्यांनीच सर्वांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न केल्याने आपला पक्ष त्यांच्या पक्षाचा आणखी एका पक्षाशी आघाडी करून सत्तेमध्ये आला असल्याचे सांगितले. साहेबांनीही सर्वांना एक दिलाने काम करण्याचा सल्ला दिल्याचे सांगत आपल्या सहकारी कार्यकर्त्यांने केलेल्या चुकीच्या प्रकाराच्या घटनेला उजाळा देत या केसमध्ये सामंजस्याची भूमिका घेतल्याने त्यांचे आभार मानले. आणि आपल्यावर सुरू असलेल्या दुसऱ्या एका खटल्याला आपले उमेदवार जबाबदार आहे आणि ते मात्र सामंजस्याची भूमिका घेत नाही याबद्दल खंत व्यक्त केली. मेळाव्यातील नेत्यांचे विचार ऐकून प्रभावित झालेला गबरू घरी परतला. मात्र काही पदाधिकारी तेथून थेट श्रमपरिहारासाठी निघून गेले.

श्रमपरिहाराच्या बैठकीतील एक कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्यातील गप्पांची ‘घन’घोर आणि मनाची तड’फड’ होणारी रेकॉर्डिंग गबरूच्या मोबाईलवर आली. तशी ती अनेकांच्या मोबाईलवर देखील पसरली होती. व्हाट्सअप ग्रुप वर त्याच्यावर एका पाठोपाठ एक कमेंट येऊन आदळत होत्या. जरा वेळ काय झालं ते गबरूलाही समजेना. नंतर मात्र हळूहळू गबरूला याचा उलगडा होऊ लागला. आपल्याच पक्षातील एका जुन्या पदाधिकाऱ्यांशी संबंधित असा तो संवाद होता. सोबतच आघाडीतील पक्षाच्या महिलांविषयी अपशब्द वापरल्याचे दिसत होते. झाला प्रकार खेदजनक असल्याने गबरूनेही आपला निषेधाचा मेसेज ग्रुपवर सोडला.

या संवादाची क्लिप केवळ त्या ग्रुप वरती अवलंबून राहिली नाही तर ती गबरूच्या पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर देखील गेली, त्यामुळे सर्वांचाच संताप झाला. व्हायरल क्लिप मधील संवाद करणारा पदाधिकारी तर शोधूनही कोणाला सापडेना. काही जण तर थेट आपल्याच पक्षात वाद निर्माण करणाऱ्या त्या पदाधिकाऱ्याला हाणामारीचीच भाषा करू लागले. वरपर्यंत क्लिप व्हायरल झाल्याने वरच्या पदाधिकाऱ्यांनीही सारवासारव करत संबंधितांमध्ये मध्यस्थी घडवून आणण्याचा प्रयत्न केला. गबरूच्या गावालगत असलेल्या एका खेड्यात यासाठी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राजधानीतून आलेल्या पाहुण्यांनी मध्यस्थी केली खरी मात्र या सर्व भानगडीत झालेल्या तानातानित ‘कानशील’ मात्र गरम झाली. बैठकीत माफीनामा झाल्याचे देखील गबरूला एका बातमीतून समजले. नेमकं काय घडलं असेल याचा विचार करीत गबरूने पुन्हा आपली सतरंजी टाकली आणि झोपी गेला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 450
गबरू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.