बुधवार, दि. १७ एप्रिल
संगमनेर तालुक्यातील साकुरमध्ये मंगळवारी रात्री चार चाकी वाहनात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. मनोज गोविंद वाळुंज (रा. टाकळी ढोकेश्वर, पारनेर) असे या तरुणांचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे.
साकुरमधील गव्हाळीत एका झाडाखाली उभ्या असलेल्या चार चाकी वाहनामध्ये एक तरुण निपचित पडला असल्याची माहिती मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घारगाव पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मिळालेल्या माहितीत मनोज गोविंद वाळुंज असं या तरुणाचं नाव असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप समोर आले नसले तरी घारगाव पोलीस या संदर्भात पुढील तपास करत आहे.


