Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये शेततळ्यात बुडून दोन भावंडाचा मृत्यू, रामनवमी उत्सवावर दुःखाचे सावट
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये शेततळ्यात बुडून दोन भावंडाचा मृत्यू, रामनवमी उत्सवावर दुःखाचे सावट

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/04/2024Updated:17/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, दि.१७ एप्रिल

पाटाच्या कडेला खेळण्यासाठी गेलेल्या दोघा सख्या भावंडाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना बुधवारी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली. संगमनेर मध्ये राम नवमी उत्सव जल्लोषात साजरा होत असताना दोघा भावंडाच्या मृत्यूच्या या वृत्तामुळे संगमनेरात दुःखाची छाया पसरली.

ऋतिक सारंगधर पावसे (वय १२ वर्ष) व प्रणव सारंगधर पावसे (वय ८ वर्ष, दोघे रा. हिवरगाव पावसा ता. संगमनेर) अशी दोघा मृत भावंडांची नावे आहे. बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रात्री उशिराने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दुर्दैवाची बाब म्हणजे वर्षभरापूर्वीच या मुलांच्या वडिलांचा मृत्यू झाला. तर तळ्यात तरंगलेल्या चपलेवरून मुलांच्या मृत्यूची ही बाब लक्षात आली. अनुक्रमे पाचवे आणि तिसरी शिक्षण घेणारे दोघे भाऊ राम नवमीची शाळेला सुट्टी असल्याने दुपारी जेवल्यानंतर घराबाहेर खेळण्यासाठी पडले होते. सायकल वरून खेळता खेळता ते काही अंतरावर असलेल्या पाटाजवळ रहात असलेल्या त्यांच्या नातेवाईकांकडे आले होते. तेथूनच खेळत खेळत ते शेततळ्याजवळ पोहोचले.

खेळता खेळता पाय घसरून ते शेततळ्यात पडले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेततळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हा प्रकार कोणाच्या लवकर लक्षात आला नाही. मात्र पाण्यात तरंगणाऱ्या चपला बघून काहीतरी अघटीत घडल्याच्या संशयाने शेततळ्याजवळ जमलेल्या लोकांनी शेततळ्यात शोध घेतला असता तळाशी पाण्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. संगमनेर तालुका पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. उपचारासाठी दोन्ही मुलांना घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकाराने तालुक्यात दुःखाची छाया पसरली आहे.

यासंदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास ढूमने यांनी दिली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,586
दुःखद शेततळ्यात बुडून मृत्यू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar04/09/20260

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण…

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.