शनिवार, दि.२० एप्रिल
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अद्याप एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नसून आज ९ इच्छुक उमेदवारांनी २२ उमेदवारी अर्ज नेले असण्याची माहिती देण्यात आली आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून शुक्रवार पर्यंत २० इच्छुकांनी ४३ उमेदवारी अर्ज नेले होते. त्यात आणखी नऊ जणांची भर पडली आहे. इच्छुकांची संख्या वाढत असली तरी गेल्या तीन दिवसात एकही उमेदवारी अर्ज या मतदारसंघात दाखल झाला नाही.
सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळता गुरुवारपर्यंत (दि.२५ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
त्यामुळे शेवटच्या दोन-तीन दिवसात प्रमुख उमेदवारांसह अन्य इच्छुकांचे मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


