Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मोदी सगळ्यात मोठे हप्ता बहादूर, त्यांचे कार्यालय वसुली कार्यालय: प्रकाश आंबेडकर
राजकारण

मोदी सगळ्यात मोठे हप्ता बहादूर, त्यांचे कार्यालय वसुली कार्यालय: प्रकाश आंबेडकर

मुर्तीजापुर येथील सभेत पंतप्रधानांबद्दल केले प्रश्न उपस्थित
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 22, 2024Updated:April 22, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, दि.२२ एप्रिल

पंतप्रधानांचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय राहिले नसून ते आत्ता वसुलीचे कार्यालय झाले आहे. मोदी सगळ्यात मोठे हप्ता बहादूर आहेत. मोदींनी ईडी लावली. सीबीआय लावली. आयबी मागे लावली. इन्कम टॅक्स विभाग मागे लावला. यंत्रणा येत होत्या. नोटीस दिल्या, रेड केल्या. पण एकाला आतमध्ये घातले का? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

राज्यात महाविकास आघाडीसोबतची चर्चा फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून २० पेक्षा अधिक ठिकाणी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहेत. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोला लोकसभेतून निवडणूक लढवत असून यासाठी या मतदारसंघात त्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. रविवारी (ता. २१ एप्रिल) झालेल्या मूर्तिजापूर येथील सभेतून आंबेडकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.

आंबेडकर म्हणाले, भाजप आणि नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने मुसलमानांच्या विरोधात नसून ते केवळ तसं भासवत आहे. ते देशातील हिंदूंच्या विरोधात आहे. ते मुसलमानांच्या विरोधात नसून केवळ तसे भासवत आहे. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यापासून किती भारतीय कुटुंबांनी देश आणि भारताचे नागरिकत्वही सोडले असा सवाल उपस्थित करत आपण हे गुगलवर तपासू शकता, याबाबतची सर्व आकडेवारी आपल्याला मिळेल असे सांगत त्यांनी मोदींना कंटाळून देशभरातील १७ लाख हिंदू कुटुंब देश सोडून गेल्याचा गंभीर आरोप केला.

ज्या १७ लाख हिंदू कुटुंबांची संपत्ती ५० कोटी पेक्षा जास्त आहे त्यांना नामोहरण करण्यात आले. मानसिक त्रास दिला गेला आणि यामुळे कंटाळून त्यांनी भारतीय नागरिकत्व सोडले व परदेशाचे नागरिकत्व घेतले असा दावा आंबेडकरांनी केला आहे.

तसेच, स्मार्टसिटी म्हणजे शहरातील कचरा रोज उचलला पाहिजे. स्मार्ट सिटी म्हणजे विना खड्ड्याचा रस्ता असतो. पण कापसाला भाव नाही. याच्याकडे लक्ष न देता, सरकार फालतू गोष्टींमध्ये लक्ष घालू लागले आहे. या गावातील भटक्या विमुक्त जातीतील व्यक्तीतील लोकांना सांगितले तर तो पूर्वीच्या काळात जेलमध्येच असायचा. कागदपत्र नसले तर तुम्हाला जेलमध्ये टाकू. राज्यघटना म्हणते ज्याचा जन्म भारतात झाला तो भारतीय नागरिक आहे. हे म्हणतात, कागद दाखवा. असंतोष कसा वाढेल, माणसात भिती कशी राहिल, असे प्रयत्न यांच्याकडून होत असल्याचा आरोपही आंबेडकरांकडून करण्यात आला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 517
प्रकाश आंबेडकर भाजप लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.