Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात कारखान्याकडून १० लाख ८५ हजार मेट्रिक टन ऊस गाळप, ऊस उत्पादकांनी एकरी उत्पादन वाढवण्यावर भर देण्याची गरज: थोरात
शेती व सहकार

थोरात कारखान्याकडून १० लाख ८५ हजार मेट्रिक टन ऊस गाळप, ऊस उत्पादकांनी एकरी उत्पादन वाढवण्यावर भर देण्याची गरज: थोरात

थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, दि.२२ एप्रिल 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाची सांगता आज होत आहे. या हंगामात कारखान्याने १० लाख ८५ हजार मेट्रिक टनाचे उच्चांकी ऊस गाळप केले असून यापुढील काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२०२४ च्या ऊस गळीत हंगामाची सांगता थोरात यांच्या उपस्थितीत झाली, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. समवेत व्यासपीठावर कांचनताई थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, हिरालाल पगडाल, इंद्रजीत थोरात, रामहरी कातोरे, गणेश कारखान्याचे व्हा. चेअरमन विजय दंडवते, विक्रांत दंडवते, अविनाश सोनवणे, ॲड. रामदास शेजुळ आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १० लाख मेट्रिक टन ऊस निर्मिती झाल्यास उत्पादन खर्च कमी होऊन कारखान्याची अर्थव्यवस्था आणखी चांगली होणार आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणखी चांगला भाव देता येईल. डेव्हलपमेंट विभाग व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी जास्तीत जास्त उत्पादनावर भर देण्याची आवश्यकता आहे. दुष्काळी परिस्थितीत देखील कारखान्याने सुमारे अकरा लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले.

खाजगी उद्योगात फारसे निर्बंध नाहीत त्या उलट परिस्थिती सहकारी उद्योगांमध्ये आहे. सरकारने साखर कांदा ग्राहकांना स्वस्त दराने द्यायला हवा मात्र यासाठी शेतकऱ्याचे नुकसान देखील व्हायला नको. यासाठी सातत्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने अनुदानाच्या रूपाने मदत केलीच पाहिजे. निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी आल्यामुळे काही प्रमाणात मदत झाली आहे. मात्र या पाण्याचे नियोजन चांगले होणे गरजेचे आहे. या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी आगामी काळात काम करावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले, दुष्काळी परिस्थितीतही न डगमगता कारखान्याने चांगले गाळप करताना वीज निर्मितीसह अमृत शक्ती खत व इतर उपपदार्थांची निर्मिती केली.

१० कोटी ५१ लाख युनिटची वीज निर्मिती…

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिकूल परिस्थितीमध्ये दहा लाख मेट्रिक टनाच्या पुढे गाळप करणे हे सांघिक काम आहे. दुष्काळी परिस्थिती ११.५०% रिकवरी कारखान्याने मिळवली असून १० कोटी ५१ लाख युनिटची वीज निर्मिती केली आहे. – बाबा ओहोळ.

संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मिनानाथ वर्पे, अभिजीत ढोले, भास्करराव आरोटे, भाऊसाहेब शिंदे, तुषार दिघे, संपतराव गोडगे, अनिल काळे, विनोद हासे, मंदाताई वाघ, मीराताई वर्पे, संभाजी वाकचौरे, सुभाष सांगळे, विक्रांत दंडवते, सुरेश झावरे, सुरेश थोरात, विष्णुपंत रहाटळ, ॲड. सुहास आहेर, ॲड. उदय ढोमसे, सेक्रेटरी किरण कानवडे यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सांगता समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार बाळासाहेब थोरात

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,071
थोरात कारखाना बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.