Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सांगलीत महाविकास आघाडीत बिघाडी, विशाल पाटील यांचे उमेदवारी कायम; तीन पाटलांमध्ये होणार लढत!
राजकारण

सांगलीत महाविकास आघाडीत बिघाडी, विशाल पाटील यांचे उमेदवारी कायम; तीन पाटलांमध्ये होणार लढत!

काँग्रेस कडून होणाऱ्या कारवाईकडे लक्ष
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 22, 2024Updated:April 22, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, दि.२२ एप्रिल 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत अखेर बिघाडी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरू होता. त्यातच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत त्यांना पाठिंबा दर्शविला होता.

महाविकास आघाडीतील जागा वाटपापूर्वीच सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. यामुळे काँग्रेसमध्ये संतापाचे वातावरण होते. शेवटच्या क्षणापर्यंत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला यावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र यात काँग्रेस नेत्यांना अपयश आले. विशाल पाटील यांनी या मतदारसंघातून आपला काँग्रेस आणि अपक्ष असे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आता पाटील यांचा अपक्ष अर्ज राहिल्याने त्यांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील असे तीन दिवसांपूर्वी म्हटले होते मात्र पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी काँग्रेस नेत्यांनी देखील प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना अपयश आले.

सांगली तीन पाटलांमध्ये लढत...

सांगलीमध्ये सात मे रोजी मतदान होत आहे. विशाल पाटील यांचे बंधू माजी खासदार प्रतीक पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या मतदारसंघात आता ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, भाजपाचे संजयकाका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील या तीन पाटलांमध्ये लढत रंगणार आहे. ‘लिफाफा’ चिन्ह घेऊन पाटील मैदानात उतरले त्यामुळे तीन पाटलांसह २१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकून उभे राहिले आहे. विशाल पाटील या मतदारसंघात बाजीगर ठरतात की त्यांच्या बंडखोरीचा फायदा कोणाला होतो, हे निकालानंतर समोर येईल.

विशाल पाटील यांच्यावर कारवाईचे संकेत…

विशाल पाटील आपल्या उमेदवारीच्या भूमीवर ठाम राहिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे संकेत काँग्रेस पक्षाकडून देण्यात आले होते. मोठ्या दबाव-तंत्र्यांकडे पाटील यांनी आपली भूमिका कायम ठेवल्याने आता काँग्रेसकडून त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाते याकडे लक्ष आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 506
लोकसभा निवडणूक विशाल पाटील सांगली लोकसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

By अनंत पांगारकरJune 12, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ​मुंबई | विशेष प्रतिनिधी: राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध…

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.