Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दोन टप्प्यातील तेरा पैकी दहा जागा मविआला मिळणार, फडणवीसांना तुरुंगात जाण्याची वाटत होती भीती तर निवडणुकीनंतर मुख्यमंत्री राजकारणात दिसणार नाही: शिवसेना नेते, खासदार संजय राऊत
राजकारण

दोन टप्प्यातील तेरा पैकी दहा जागा मविआला मिळणार, फडणवीसांना तुरुंगात जाण्याची वाटत होती भीती तर निवडणुकीनंतर मुख्यमंत्री राजकारणात दिसणार नाही: शिवसेना नेते, खासदार संजय राऊत

शिर्डीत पत्रकारांशी संवाद
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/04/2024Updated:26/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, दि.२६ एप्रिल 

लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारणात कुठेही दिसणार नाही, फोन टॅपिंग प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटत होती, असे मोठे विधान करत पहिल्या दोन टप्प्यातील तेरा पैकी दहा जागा महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई दक्षिण मध्य मतदार संघातील उमेदवार अनिल देसाई, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी राऊत बोलत होते.

आतापर्यंत राज्यात दोन टप्प्यात मतदान पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघात मतदान झाले तर आज आठ मतदारसंघात मतदान होत आहे. या दोन्ही टप्प्यातील तेरा पैकी दहा जागा महाविकास आघाडी जिंकेल, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नखशिखांत भ्रष्टाचारी असल्याचाही आरोप त्यांनी केला. आता त्यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटत आहे. सत्तेत असताना तुम्ही नेत्यांचे फोन टॅपिंग केले, त्यामुळे आता मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असं म्हणून कसं चालेल. आम्ही साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येथे आलो, मुख्यमंत्र्यांची शिर्डीत धावाधाव कशासाठी सुरू आहे ते माहित नाही. त्यांचा येथील उमेदवार पडणार हे निश्चित आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कचाकच बटन दाबा प्रकरणात निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या क्लीनचीट संदर्भात बोलताना ते म्हणाले, निवडणूक आयोग ही भाजपाची शाखा आहे. अतिरिक्त शाखा असणाऱ्या आयोगाकडून निष्पक्ष कामाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. उद्या केंद्रात आमचे सरकार येईल. त्यानंतर घटनात्मक संस्थांची फेररचना केली जाईल. या संस्था सध्या सारख्या राजकीय हस्तक्षेप न होता काम करतील याकडे आम्ही लक्ष देऊ असे देखील राऊत यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 571
लोकसभा निवडणूक शिर्डी लोकसभा संजय राऊत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar04/09/20260

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण…

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.