Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाजपाला देशभरात २०० जागाही मिळणार नाही, राज्यात महाविकास आघाडीला ४० पेक्षा अधिक जागा: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
राजकारण

भाजपाला देशभरात २०० जागाही मिळणार नाही, राज्यात महाविकास आघाडीला ४० पेक्षा अधिक जागा: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

वंचितला मतदान म्हणजे भाजपाला मदत
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 30, 2024Updated:April 30, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
लग्नाला यायचं हं!

वंचितला मतदान म्हणजे भाजपला मदत…

मंगळवार, दि.३० एप्रिल

देशभरात सुरू असलेला ईडी, सीबीआयसह केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, न्याय व्यवस्थेमधील दबाव, वाढलेली महागाई, बेरोजगारी, राज्या-राज्यात झालेले फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडलेले नाही, देशभरात निर्माण झालेली अस्थिरता यामुळे देशात भाजप विरोधात मोठी लाट निर्माण झाले असून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २०० जागाही मिळू शकणार नाही. याचबरोबर राज्यातील महायुतीचे सरकार जनतेला मान्य नसून महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा मिळत असल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडी ४० पेक्षा अधिक जागा मिळवेल असा विश्वास काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

सोमवारी सायंकाळी संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार शुभारंभावेळी थोरात बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, भाऊसाहेब वाकचौरे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, नांदेड येथील प्रा. यशपाल भिंगे, बीड येथील दादासाहेब मुंडे, बाबा ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, हिरालाल पगडाल, उत्तम घोरपडे, ज्ञानदेव गायकर, अमर कतारी, कैलास वाकचौरे, आरपीआयचे किरण रोहम आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

उमेदवाराचे चिन्ह घराघरात पोहोचविण्याचे आवाहन करत थोरात म्हणाले, राज्यात सभा घेणाऱ्या पंतप्रधानांनी भाषणामध्ये दहा वर्षात केलेली विकास काम आणि पुढील पाच वर्षात करावयाची कामे याचा अहवाल जनतेला देणे अपेक्षित आहे मात्र पंतप्रधान केवळ धर्माचे राजकारण करत असून केंद्रीय यंत्रणांचा देशात गैरवापर सुरू आहे. न्यायव्यवस्था दबावाखाली आहे. बेरोजगारी, महागाई वाढली आहे. मनिपुरमध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार झाला. देशासाठी ऑलिंपिक जिंकणाऱ्या महिला खेळाडूवर अन्याय झाला. मात्र पंतप्रधानांनी याकडे लक्ष दिले नाही. देशभरात सर्वत्र अस्थिरता आणि अनागोंदी निर्माण झाली असून देशाच्या इतिहासात भाजपचा कालखंड हा काळा इतिहास म्हणून लिहिला जाईल.

सध्याचे महायुतीचे खासदार दहा वर्ष कोणाला दिसले नाही. कोणतेही विकासाचे काम नाही मात्र बढाया मारण्यात ते पुढे आहेत. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता देशाची लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी हा विकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ. तांबे म्हणाले, देशात भाजपाविरोधी मोठी लाट निर्माण झाली आहे. मोदींच्या कार्यकाळात सर्व क्षेत्रात मोठे अपयश आले आहे. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले आहे. ही लोकशाही नसून हुकूमशाही निर्माण झाली आहे.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, दोन कोटी नोकऱ्याचे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारने देशांमध्ये मोठी बेरोजगारी निर्माण केली. गांधी परिवाराचा देशासाठी मोठा त्याग आहे. महागाईमुळे महिलांना मंगळसूत्र विकण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती भाजपने आणून ठेवली.

वंचितला मतदान म्हणजे भाजपला मदत… 

वंचितकडून उभ्या असलेल्या उत्कर्षा रूपवते यांना काँग्रेसने कायम सन्मान दिला, मोठ्या संधी दिल्या. शिर्डी मतदार संघ काँग्रेसला मिळावा यासाठी आपण मोठा प्रयत्न केला हे सर्वांना माहीत आहे. रूपवते यांनी काँग्रेस सोडणे अत्यंत चुकीचे आणि दुःखदायक आहे. लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून वंचितला मतदान करणे म्हणजे भाजपाला मदत करण्यासारखे ठरणार असल्याची टीका आमदार थोरात यांनी केली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 779
बाळासाहेब थोरात महाविकास आघाडी शिर्डी लोकसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.