Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या या नेत्याच्या प्रचार सभांना राज्यभरातून मिळतोय मोठा प्रतिसाद
राजकारण

महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या या नेत्याच्या प्रचार सभांना राज्यभरातून मिळतोय मोठा प्रतिसाद

लोकसभा निवडणुकीचे रणांगण तापले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, दि. २ मे 

लोकसभा निवडणुकीचे वातावरण राज्यात चांगलेच तापले आहे. निवडणुकीचे दोन टप्पे पार पडल्यानंतर राज्यात प्रचार सभांनी आता मोठा वेग घेतला आहे. पंतप्रधानांपासून राज्यातील बडे बडे नेते आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी राज्यात सभा घेत असतानाच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे स्टार प्रचारक, प्रमुख नेते, भूमिपुत्र बाळासाहेब थोरात यांच्या प्रचार सभांना देखील राज्यातून मोठी मागणी असून काँग्रेससह महाविकास आघाडीचा किल्ला राज्यात ठीक-ठिकाणी लढवितांना थोरात दिसत आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भ व दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भातील निवडणुका पार पडल्या. या मतदारसंघातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, रामटेक, अमरावती, नांदेड, हिंगोली येथे थोरात यांच्या प्रचार सभा झाल्या. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सोबतच्या सभांमध्ये देखील थोरात यांचा सहभाग होता.

राज्यात नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या समवेत देखील विविध ठिकाणी थोरात यांनी सभांना हजेरी लावली. थोरात यांच्याकडे राज्याबरोबरच उत्तर महाराष्ट्राची महत्त्वाची जबाबदारी असल्यामुळे त्यांनी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, शिर्डी मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या.

नासिक, धुळे, जुन्नर, सासवड, पुणे, कोल्हापूर, सांगली या ठिकाणीही थोरात यांच्या सभा पार पडल्या. राज्यातील फोडाफोडीचे राजकारण सर्वसामान्य जनतेला मान्य नसल्याचे या प्रचार दौऱ्यातून दिसून येत आहे. काँग्रेसची एकनिष्ठ असलेल्या थोरात यांची राज्यात सुसंस्कृत नेतृत्व म्हणून तसेच यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार म्हणून ओळख आहे. थोरात यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शिक्षण, रोजगार हमी, जलसंपदा असे महत्त्वाचे खाते सांभाळले आहे. याशिवाय त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय पातळी काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य हिमाचल, गुजरातचे निरीक्षक पद देखील सांभाळले आहे.

यामुळेच पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या या नेत्याच्या सभांना राज्यातून मोठ्या प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येते. थोरात यांनी अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी देखील गावोगावी प्रचार दौऱ्याच्या नियोजन केले आहे.

देशात भाजपा विरोधात तर राज्यात महायुती विरोधात मोठी लाट निर्माण झाले असून जनतेचे प्रश्न सुटू शकलेले नाहीत. मतदार आता इंडिया आघाडीच्या बाजूने उभा राहिला आहे. त्यामुळे अहमदनगर, शिर्डीसह राज्यात महाविकास आघाडीला ४० पेक्षा अधिक तर देश पातळीवर एनडीएला साडेतीनशे पेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वास थोरात व्यक्त करताना दिसतात.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,751
बाळासाहेब थोरात लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.