Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी; लिंगायत जंगम समाज बांधवांचा मोठा सहभाग
धार्मिक

संगमनेरात महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी; लिंगायत जंगम समाज बांधवांचा मोठा सहभाग

या जयंती उत्सवासाठी लिंगायत जंगम समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/04/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती संगमनेर शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या मंगलमयी सोहळ्याची सुरुवात श्री. व सौ. तोरकडी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेच्या भावपूर्ण आरतीने झाली. कार्यक्रमाचे पौरोहित्य चैतन्य लोणकर स्वामी यांनी केले. त्यांनी विधिवत पूजा संपन्न केल्याने संपूर्ण परिसरात धार्मिक व मांगल्याचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रसंगी मृणाल बागडे हिने महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनप्रवासावर आणि त्यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकणारे प्रभावी भाषण केले. बसवेश्वरांनी बाराव्या शतकात दिलेला समता, सामाजिक न्याय आणि शुद्ध मानवतेचा संदेश आजही कसा प्रस्तुत आहे, हे तिने आपल्या मनोगतातून उपस्थितांना पटवून दिले. त्यांच्या ‘कायकावे कैलास’ या तत्त्वज्ञानाचे महत्त्वही यावेळी विषद करण्यात आले.

या जयंती उत्सवासाठी लिंगायत जंगम समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सुभाष जंगम, ज्ञानेश्वर कथले, हेमंत तांदळे, दिलीप कबाडे, विलास लोणकर, बाळासाहेब जंगम, निलेश दिनकर, पूनम तांदळे, भीमाशंकर तांदळे, गणेश जंगम, निखिल तांदळे, संजय बागले, ज्ञानेश्वर वाकचौरे, दत्तात्रय मुर्तडक, अशोक लोणकर, सोमेश लोणकर आणि मंगेश सालपे यांच्यासह समाज बांधवांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी महात्मा बसवेश्वर यांच्या क्रांतिकारी विचारांचे स्मरण करत, त्यांनी दाखवलेल्या समतेच्या आदर्शांचा आपल्या जीवनात अंगीकार करण्याचा संकल्प व्यक्त केला. या सोहळ्याने समाजातील एकोपा आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 384
बसवेश्वर जयंती उत्सव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

27/08/2026

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.