Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मारहाण करून रात्रभर नग्न अवस्थेत स्मशानभूमीत बसवून ठेवले; कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या भावाची गळफास घेत आत्महत्या, गुन्हा दाखल
गुन्हेगारी

मारहाण करून रात्रभर नग्न अवस्थेत स्मशानभूमीत बसवून ठेवले; कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या भावाची गळफास घेत आत्महत्या, गुन्हा दाखल

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, दि. ३ मे

नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणानंतर या प्रकरणातील पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी नग्नावस्थेत रात्रभर स्मशानभूमीत बसविल्याने आरोपीच्या चुलत भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली केली यामुळे पुन्हा एकदा राज्य हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा कोपर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन पैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेने राज्य हादरले होते. या अत्याचाराच्या घटनेने देश पातळीवर प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

विठ्ठल उर्फ नितीन शिंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी १ मे रोजी कोपर्डी (ता. कर्जत) गावातील यात्रेदरम्यान हा प्रकार घडला. गावातील यात्रेत बंटी सुद्रिक व स्वप्निल सुद्रिक या दोघा भावांचा नितीन शिंदे याच्याबरोबर वाद झाला. वादाच्या रूपांतर भांडणात झाल्याने या दोघा भावांनी नितीनला बेदम मारहाण करून त्याचे कपडे, मोबाइल आणि पैसे काढून घेत नग्न अवस्थेत गावातील स्मशानभूमीत सोडून दिले. त्याला रात्रभर तेथे बसून राहावे लागले. दरम्यान हा प्रकार त्याच्या घरी समजल्याने त्याच्या घरच्यांनी त्याला सकाळी घरी आणले. मात्र अपमानित झाल्याने त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकाराने नगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी नितीन शिंदे याने चिठ्ठी लिहून ठेवले असून या चिठ्ठीत सर्व घटनाक्रम विशद केला आहे. तसेच आपण स्वप्निल सुद्रिक व बंटी सुद्रिक यांच्यामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी आता याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघा आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. तर अन्य एका आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके पाठविण्यात आले आहे.

 

कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपीने तुरुंगात तर त्याचा चुलत भावाने घरीच घेतला गळफास! 

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू शिंदे याला फाशीची शिक्षा झाली होती. त्यानंतर त्याने तुरुंगातच गळफास घेत आत्महत्या केली. नितीन हा या अत्याचार प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदेचा चुलत भाऊ आहे. पप्पूचा नातेवाईक असल्याचा कारणावरून तरुणीच्या नातेवाईकांनी नितीन शिंदे याला मारहाण केली तसेच त्याला नग्न अवस्थेत रात्रभर स्मशानभूमीत बसवून ठेवले. यातून अपमानित झाल्याच्या भावनेतून नितीन शिंदे याने पप्पू शिंदेच्या घरीच आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,599
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.