Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » देवीच्या यात्रेत सशस्त्र हल्ल्यात तरुणाचा मृत्यू! अहमदनगर जिल्ह्यातील घटना
गुन्हेगारी

देवीच्या यात्रेत सशस्त्र हल्ल्यात तरुणाचा मृत्यू! अहमदनगर जिल्ह्यातील घटना

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 3, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, दि. ३ मे 

लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त सुरू असलेल्या छबिना मिरवणुकीत तरुणावर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. नगर जिल्ह्यातील शेवगावमधील शहर टाकळी येथे गुरुवारी (दि. २) रात्री ही घटना घडली. अक्षय संजय आपशेटे (वय २४ वर्ष, रा. शहर टाकळी, शेवगाव) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

यासंदर्भात मृत तरुणाचा भाऊ संकेत संजय आपशेटे याने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात अजय दावीद कोल्हे, किरण उत्तम चव्हाण, पंकज लक्ष्मण कोल्हे, अविनाश साईनाथ पवार व विकास संजय कोल्हे या पाच आरोपींविरुद्ध खुनासह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संकेत आपशेटे ज्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २ मे रोजी रात्री दहा वाजता ते चुलत भावासह गावाच्या यात्रेत फिरत असताना पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास यात्रेतून जोरात आरडाओरडा करण्याचा आवाज आल्याने आवाजाच्या दिशेने जाऊन बघितले असता लक्ष्मी माता मंदिराजवळ माझा लहान भाऊ अक्षय आपशेटे याला गावातीलच ओळखीचे अजय कोल्हे हा हातातून सुरीने, किरण चव्हाण हातातील सत्तुरने, पंकज कोल्हे हातातील फायटरने, अविनाश पवार हातातील लोखंडी रॉडने, विकास कोल्हे हा त्याच्या हातातील लाकडी काठीने मारहाण करत असल्याचे दिसले. यावेळी त्यांच्यासोबत गावातील आणखी तीन-चार जण होते.

जखमी अवस्थेत अक्षयला गावातील रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांनी शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले. ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान शेवगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आले असून अन्य आरोपी फरार आहेत. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी दिली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,029
पोलीस शेवगाव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

By अनंत पांगारकरAugust 2, 20260

प्रवीण पुरो  केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण अभियानांतर्गत शैक्षणिक व्यवस्थेत करण्यात आलेल्या बदलाचे विपरीत आणि दीर्घकालीन…

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.