Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलीस उपअधीक्षकांना माहिती मिळाली अन् ३ लाखाचे दीड हजार किलो गोमांस पकडले, दोघांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

पोलीस उपअधीक्षकांना माहिती मिळाली अन् ३ लाखाचे दीड हजार किलो गोमांस पकडले, दोघांवर गुन्हा दाखल

अल्टो कारसह ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत!
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 5, 2024Updated:May 5, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, दि. ५ मे 

असंख्य कारवायानंतर देखील संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच आहे. शहरात मदिना नगर भागात संगमनेर अकोल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत शनिवारी दुपारी तीन लाख रुपये किमतीचे दीड हजार किलो गोमांस पोलिसांनी पकडले आहे.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक राहुल कचरू डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साहील इजराइल कुरेशी (वय २० वर्षे रा. मदिनानगर) व हाश्मी नशीर कुरेशी उर्फ बुड्डी (वय ३२ वर्षे रा. मदिनानगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना शनिवारी शहरातील मदिना नगर भागात असलेल्या गौसिया मज्जिद शेजारी गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वाघचौरे यांनी पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस कर्मचारी राहुल डोके व राहुल सारबंदे यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.

दुपारी दोन वाजता पथकाने मदिनानगर मधील गल्ली क्रमांक १ मध्ये असलेल्या गौसीया मस्जीद शेजारील पत्राच्या शेडच्या आडोशाला जात खात्री केली असता अल्टो कारमध्ये (एम.एच. १२ डी.एस. १७६८) अंदाजे दोनशे किलो वजनाचे गोमांस आढळून आले. पथकाने शेजारील वाड्यात तपासणी केली असता तेथे देखील १३०० किलो गोमांस आढळले.

घटनास्थळी पोलीस पथकाने साहील इजराइल कुरेशी या वीस वर्षाच्या तरुणाला पकडले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीत या गोमांसाचा मूळ मालक हाश्मी नशीर कुरेशी उर्फ बुड्डी असल्याचे समोर आले. या कारवाईत पोलिसांनी दीड हजार किलो गोमांस आणि अल्टो कार जप्त केली आहे. तसेच दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 889
कत्तलखाना कारवाई पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

By अनंत पांगारकरAugust 2, 20260

प्रवीण पुरो  केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण अभियानांतर्गत शैक्षणिक व्यवस्थेत करण्यात आलेल्या बदलाचे विपरीत आणि दीर्घकालीन…

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.