Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उबाठाच्या मशालीची यंदाच्या निवडणुकीत चिलीम: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राजकारण

उबाठाच्या मशालीची यंदाच्या निवडणुकीत चिलीम: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 5, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, दि. ५ मे 

महायुतीचे आपले सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहे. विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवत आहोत. जिथे जातो तिथे जनता बाळासाहेबांच्या विचारांना आणि विकासाला मत देणार असल्याचे सांगते. त्यामुळे येथेदेखील धनुष्यबाणाच्या खटक्यावर बटन दाबून जनता उबाठाचा टांगा पलटी घोडे फरार करेल, निवडणुकीत मशालीची चिलीम होईल अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

शनिवारी मुख्यमंत्री कोल्हापूरमधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, धनुष्यबाणाशी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही माफ करणार का? बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारांना माफ करणार का? विकास करताना जातीभेद केला नाही. या राज्यातील नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत. कोल्हापुरातील टोल बंद करण्याचा निर्णय आपण घेतला. मराठा समाजाला आपण आरक्षण दिले. विरोधकांनी सत्तेत असताना फक्त मराठा समाजाचा वापर केला. हे सरकार देणारे सरकार आहे. तुम्ही एक हाताने दिले तर सरकार तुम्हाला दोन हाताने देईल. आपले सरकार बुलेट ट्रेनच्या स्पीडने काम करत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने पराभूत केले. इतकी वर्ष सत्तेत असताना काँग्रेसला संविधान दिन साजरा करावा वाटला नाही. आता म्हणतात संविधान बदलणार पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधान नाही बदलणार. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. हे महायुतीचे सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणारे सरकार आहे.

पूर्वीचे सरकार कमिशन आणि कट मागू लागले तसे उद्योजक राज्यातून पळून गेले. पण महायुतीचे सरकार आल्यानंतर उद्योजक पुन्हा राज्यात येत आहेत. केंद्रात १० वर्षात केलेले काम आणि राज्यात दोन वर्षात केलेले काम याची पोचपावती मतदारांनी दिली पाहिजे. काँग्रेसचे उमेदवार मतदार संघ शोधत आहेत. वायनाडनंतर आता रायबरेली कारण त्यांना स्वतःच्या विजयाची खात्री उरलेली नाही, असे लोक देशाचे काय नेतृत्व करणार अशी टीका मुख्यमंत्र्यानी केली.

आपल्याला ५६ इंचाची छाती असणारा पंतप्रधान हवा आहे. महाराजांच्या वारसांना राज्यसभेचे तिकीट दिले नाही याबाबत उबाठानी शेण खाल्ल्याची कबुली दिली. राम भक्तांना हरामखोर म्हणणाऱ्या सोबत हातमिळवणी करून त्यांनी तेच खाल्ले आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. २०१९ मध्ये बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस सोबत घरोबा केला आणि त्यांनी जनतेचा विश्वासघात केला. जनतेने शिवसेना भाजप युतीसाठी मतदान केले होते. आपले सरकार फिल्डवर जाऊन काम करणारे असल्याचे ते म्हणाले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 497
एकनाथ शिंदे लोकसभा निवडणूक शिवसेना शिंदे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.